Home /News /sport /

IPL 2022 : राहुलचं मुंबईविरुद्ध आणखी एक खणखणीत शतक, MI ला 169 रनचं आव्हान

IPL 2022 : राहुलचं मुंबईविरुद्ध आणखी एक खणखणीत शतक, MI ला 169 रनचं आव्हान

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केएल राहुलने (KL Rahul) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक केलं आहे. याआधीही 16 एप्रिलला झालेल्या सामन्यातही राहुलने मुंबईविरुद्ध शतक झळकावलं होतं.

    मुंबई, 24 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केएल राहुलने (KL Rahul) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक केलं आहे. याआधीही 16 एप्रिलला झालेल्या सामन्यातही राहुलने मुंबईविरुद्ध शतक झळकावलं होतं. केएल राहुलच्या या शतकामुळे लखनऊने 20 ओव्हरमध्ये 168/6 पर्यंत मजल मारली. राहुलने 62 बॉलमध्ये नाबाद 103 रन केले, यात 12 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. मुंबईकडून कायरन पोलार्ड हा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. पोलार्डने 2 ओव्हरमध्ये 8 रन घेऊन 2 विकेट घेतल्या. याशिवाय रिले मेरेडिथला 2 आणि जसप्रीत बुमराह, डॅनियल सॅम्स यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. आयपीएलच्या या मोसमातलं हे चौथं शतक होतं, यातली 3 शतकं ही मुंबईविरुद्धच आली आहेत. केएल राहुल आणि जॉस बटलर (Jos Buttler) यांनी प्रत्येकी 2-2 शतकं केली आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या बटलरनेही मुंबईविरुद्धच शतक केलं होतं. आयपीएलच्या या मोसमात मुंबईला अजूनपर्यंत एकही मॅच जिंकता आलेली नाही. पहिल्या 7 सामन्यांमध्ये टीमचा पराभव झाला आहे. या सामन्यामध्ये जर मुंबईच्या पदरी पुन्हा निराशा आली, तर त्यांचं प्ले-ऑफचं आव्हान अधिकृतरित्या संपुष्टात येईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants, Mumbai Indians

    पुढील बातम्या