पुणे, 6 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबई आणि कोलकाता (MI vs KKR) यांच्यात आज पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी दिलासादायक बातमी आहे. टीमचा महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फिट झाला आहे, तसंच त्याने मैदानामध्ये जोरात सरावही केला आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे सूर्या पहिल्या दोन मॅच खेळला नव्हता, याचा फटका मुंबईला मोठ्या प्रमाणावर बसला होता.
आयपीएलच्या या मोसमात मुंबईचा दिल्ली आणि राजस्थानविरुद्ध पराभव झाला. या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईने चांगली कामगिरी केली होती, पण दोन्हीवेळा एका खराब ओव्हरमुळे मॅच मुंबईच्या हातातून निसटली. केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबईला ही चूक टाळावी लागणार आहे.
इशान किशनने (Ishan Kishan) पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकं केली, तसंच नवोदित तिलक वर्मानेही धमाका केला, पण टीमच्या मधल्या फळीला दोन्ही मॅचमध्ये संघर्ष करावा लागला. टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स आणि कायरन पोलार्ड हे तिन्ही आक्रमक खेळाडू अपयशी ठरले आहेत.
मुंबई आणि कोलकाता यांच्यामध्ये आतापर्यंत 29 मॅच झाल्या आहेत, यातल्या मुंबईने 22 तर कोलकात्याने फक्त 7 मॅच जिंकल्या. आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा करणाऱ्या मुंबईला केकेआरविरुद्धचं हे रेकॉर्ड नक्कीच दिलासा देणारं असेल.
मुंबईची टीम
रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, अर्जुन तेंडुलकर, बसिल थंपी, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अरशद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन एलन, कायरन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल, इशान किशन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, KKR, Mumbai Indians, Rohit sharma, Suryakumar yadav