मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : Mumbai Indians च्या शेवटच्या सामन्यासाठी मैदानात पोहोचली Sara Tendulkar, शेअर केला Cute Video

IPL 2022 : Mumbai Indians च्या शेवटच्या सामन्यासाठी मैदानात पोहोचली Sara Tendulkar, शेअर केला Cute Video

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) आहे. मुंबई इंडियन्सना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाठिंबा देण्यासाठी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) स्टेडियममध्ये पोहोचली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही टक्कर आहे. पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी मोसमाचा शेवट गोड करण्याची संधी आहे, तर दुसरीकडे दिल्लीसाठी हा सामना करो या मरो आहे. या सामन्यात पराभव झाला तर दिल्लीचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगेल.

मुंबई इंडियन्सना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाठिंबा देण्यासाठी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) स्टेडियममध्ये पोहोचली, यावेळी तिने मुंबई इंडियन्सची जर्सीही घातली होती. याआधीही ती बऱ्याच वेळा मुंबईच्या मॅच पाहण्यासाठी आली होती.

सचिन तेंडुलकरची मुलगी असलेली सारा तेंडुलकर सोशल मीडियावर बरीच ऍक्टीव्ह असते. 24 वर्षांची सारा सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेयर करते. इन्स्टाग्रामवर साराने 2 मिलियन म्हणजेच 20 लाख फॉलोअर्स आहेत.

सारा तेंडुलकर मागच्या काही महिन्यांपासून भारतात आहे, पण लंडन युनिव्हर्सिटीमध्ये ती मेडिसनचा अभ्यास करत आहे. याआधी तिने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार सारा अभिनय क्षेत्रातही पदार्पण करणार आहे.

अर्जुन तेंडुलकरला संधी नाही

मुंबई इंडियन्सने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 159/7 वर रोखलं. मुंबईच्या मोसमातल्या अखेरच्या सामन्यातही अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी मिळाली नाही. लिलावामध्ये मुंबईने अर्जुनला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. मागच्या वर्षीही अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या टीममध्ये होता, पण तेव्हाही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians