मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 MI vs DC : मुंबईच्या हातात दिल्ली आणि RCB चं भविष्य, अर्जुनला संधी नाहीच

IPL 2022 MI vs DC : मुंबईच्या हातात दिल्ली आणि RCB चं भविष्य, अर्जुनला संधी नाहीच

Photo-IPL/Twitter

Photo-IPL/Twitter

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Delhi Capitals) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Delhi Capitals) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्ससोबतच आरसीबीसाठीही (RCB) हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईने या सामन्यासाठी टीममध्ये दोन बदल केले आहेत. ट्रिस्टन स्टब्सऐवजी डेवाल्ड ब्रेविस आणि संजय यादवऐवजी ऋतिक शौकीन यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे दिल्लीच्या टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. ललित यादवऐवजी पृथ्वी शॉचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. टायफॉईडमुळे शॉ रुग्णालयात दाखल होता.

मोसमातल्या अखेरच्या सामन्यात मुंबई सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण अर्जुनला आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सना हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तसंच या सामन्यात मुंबईचा विजय झाला तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवेल. गुजरात, राजस्थान आणि लखनऊ या तीन टीम आधीच प्ले-ऑफमध्ये दाखल झाल्या आहेत. आता चौथ्या स्थानासाठी दिल्ली आणि आरसीबी यांच्यात स्पर्धा आहे.

Live Score पाहण्यासाठी क्लिक करा

दिल्लीने या मोसमात 13 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर आरसीबीने 14 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 6 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. दिल्लीचा नेट रन रेट आरसीबीपेक्षा चांगला असल्यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला फक्त ही मॅच जिंकावी लागणार आहे.

दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी या मोसमातली कामगिरी अत्यंत खराब झाली. सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकणारी मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे. मुंबईने 13 पैकी फक्त 3 मॅच जिंकल्या आणि 10 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.

दिल्लीची टीम

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत, सरफराज खान, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्किया, खलील अहमद

मुंबईची टीम

रोहित शर्मा, इशान किशन, डॅनियल सॅम्स, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians, RCB