मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) शेवटही कडू झाला आहे. दिल्लीविरुद्धच्या (MI vs DC) अखेरच्या सामन्यात रोहित शर्मा 13 बॉलमध्ये फक्त 2 रन करून आऊट झाला. या सामन्यात रोहितला 10 व्या बॉलवर पहिली रन काढता आली. खलील अहमदने टाकलेल्या इनिंगच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहितच्या बॅटला एकदाही बॉल लागला नाही.
आयपीएलच्या या मोसमात रोहित शर्माने 14 सामन्यांमध्ये 19.14 च्या सरासरीने आणि 120.17 च्या स्ट्राईक रेटने 268 रन केले. या हंगामात रोहितला एकही अर्धशतक करता आलं नाही. 48 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. रोहित शर्माचा हा खराब फॉर्म टीम इंडियासाठीही चिंतेचा विषय आहे. कारण रोहित शर्मा टीम इंडियाचाही कर्णधार आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे, त्यामुळे वर्ल्ड कपआधी फॉर्ममध्ये येणं रोहित शर्मा आणि टीम इंडियासाठी गरजेचं आहे.
रोहित शर्माच्या या खराब फॉर्मचा फटका मुंबई इंडियन्सनाही मोठ्या प्रमाणावर बसला. मोसमातल्या पहिल्या 8 सामन्यांमध्ये टीमचा पराभव झाला, ज्यामुळे ते पहिलेच प्ले-ऑफच्या बाहेर पडले. मोसमातले पहिले आठही सामने गमावणारी मुंबई आयपीएल इतिहासातली पहिली टीम ठरली. या सिझनमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये मुंबईने फक्त 3 मॅच जिंकल्या तर 10 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.