मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा (Mumbai Indians vs Delhi Capitals) 5 विकेटने पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या या विजयामुळे दिल्लीचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं, तर दुसरीकडे आरसीबी (RCB) मात्र प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी चौथी टीम ठरली आहे. गुजरात, राजस्थान, लखनऊ या टीमचा आधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश झाला होता.
आरसीबीचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं सर्वस्वी मुंबईवर अवलंबून होतं, त्यामुळे आरसीबीची टीम मुंबईला जोरदार पाठिंबा देत होती. यासाठी आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरच्या प्रोफाईल फोटोचा रंगही निळा केला होता. तसंच त्यांनी मुंबईला जिंकण्यासाठी पत्रही लिहिलं होतं.
मुंबई आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेली मॅच आरसीबीचे खेळाडू हॉटेलमध्ये बसून एकत्र पाहत होते. याचे फोटोही आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये विराट कोहली टीमचा कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या बाजूला बसून मॅच पाहत असल्याचं दिसत आहे. या फोटोंमध्ये आरसीबीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर तणावही दिसत आहे.
All eyes on the game. 👀 No prizes for guessing who were supporting! #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #MIvDC pic.twitter.com/i7mrYfVYMt
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
अशा होणार प्ले-ऑफच्या मॅच
आयपीएल प्ले-ऑफमध्ये पहिला सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल. या सामन्यात विजय मिळवलेली टीम थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर लखनऊ सुपर जाएंट्स आणि आरसीबी यांच्यात एलिमिनेटरची लढत होईल. या सामन्यात पराभूत झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल, तसंच जिंकलेली टीम गुजरात आणि राजस्थान यांच्यात पराभव झालेल्या टीमविरुद्ध क्वालिफायर मॅच खेळेल, या मॅचमध्ये जिंकणारी टीम फायनलमध्ये प्रवेश करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians, RCB