मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : ...तर Mumbai Indians ची 'शेवट'ची लाजही जाणार, 10वा क्रमांक टाळण्यासाठी करावं लागणार हे काम!

IPL 2022 : ...तर Mumbai Indians ची 'शेवट'ची लाजही जाणार, 10वा क्रमांक टाळण्यासाठी करावं लागणार हे काम!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022)  मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सना यंदा 13 पैकी फक्त 3 मॅच जिंकता आल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्येही मुंबईची टीम शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022)  मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सना यंदा 13 पैकी फक्त 3 मॅच जिंकता आल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्येही मुंबईची टीम शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे. मुंबई थोड्याच वेळात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) मोसमातला त्यांचा अखेरचा सामना खेळत आहे. संपूर्ण सिझनमध्ये संघर्ष करणाऱ्या मुंबईला विजय मिळवून शेवट गोड करण्याची संधी आहे, सोबतच त्यांना अखेरच्या क्रमांकाची नामुष्कीही टाळता येऊ शकते.

आयपीएलच्या या मोसमात 10व्या क्रमांकावर शेवट टाळण्यासाठी मुंबईला दिल्लीवर 92 रननी विजय मिळवणं किंवा 9 ओव्हरमध्ये आव्हानाचा पाठलाग करण गरजेचं आहे. म्हणजेच मुंबईने पहिले बॅटिंग केली तर त्यांना 92 रननी विजय मिळवावा लागेल, किंवा दुसरी बॅटिंग आली तर दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग त्यांना 9 ओव्हरमध्ये करावा लागेल. हे करण्यात मुंबईला यश आलं तर ते पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर राहतील आणि सीएसके दहाव्या क्रमांकावर पोहोचेल. मुंबईचा नेट रनरेट -0.577 आहे, तर सीएसकेचा नेट रनरेट -0.203 एवढा आहे.

IPL 2022 : MI vs DC मॅचआधी RCB ने बदलला 'रंग', मुंबईला लिहिलं पत्र!

आरसीबीचा मुंबईला पाठिंबा

दिल्ली आणि मुंबई यांच्यातला हा सामना आरसीबीसाठीही (RCB) महत्त्वाचा आहे. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरेल, पण मुंबईला हा सामना गमवावा लागला तर दिल्ली प्ले-ऑफमध्ये दाखल होईल. गुजरात, राजस्थान आणि लखनऊ या तीन टीम आधीच प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians