IPL 2022 : बुमराहच्या भेदक बाऊन्सरवर मैदानातच पडला पृथ्वी शॉ, विकेटही गमावली, VIDEO
IPL 2022 : बुमराहच्या भेदक बाऊन्सरवर मैदानातच पडला पृथ्वी शॉ, विकेटही गमावली, VIDEO
Photo-IPL/BCCI
आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यात महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टाकलेल्या भेदक बाऊन्सरवर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मैदानातच पडला, एवढच नाही तर शॉने त्याची विकेटही गमावली.
मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 चा (IPL 2022) मोसम आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) तीन टीमचा प्रवेश झाला आहे, तर चौथ्या टीमसाठी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि आरसीबी (RCB) यांच्यात रेस आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यातला सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर ते प्ले-ऑफमध्ये पोहोचतील, पण मुंबईने ही मॅच जिंकली तर मात्र आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरेल.
या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईच्या बॉलरनी सुरूवातीपासूनच दिल्लीला धक्के दिले. 50 रनवरच दिल्लीने त्यांच्या पहिल्या 4 विकेट गमावल्या होत्या. डेव्हिड वॉर्नर 5 रनवर तर मिचेल मार्श पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. यानंतर दिल्लीने पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) रुपात तिसरी विकेट गमावली.
जसप्रीत बुमराहने टाकलेला भेदक बाऊन्सर पृथ्वी शॉला झेपलाच नाही. हा बाऊन्सर खेळण्याच्या नादात पृथ्वी शॉ मैदानात पडला, एवढच नाही तर तो विकेटही गमावून बसला. या सामन्यातून पृथ्वी शॉने दिल्लीच्या टीममध्ये पुनरागमन केलं होतं. टायफॉईड झाल्यामुळे शॉ रुग्णालयात दाखल होता, पण फिट झाल्यानंतर तो पुन्हा एकदा टीममध्ये आला. 23 बॉलमध्ये 24 रन करून शॉ पॅव्हेलियनमध्ये परतला.
आयपीएलच्या या मोसमात दिल्लीने 13 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत, तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर पडणारी पहिली टीम होती. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईने या मोसमात पहिल्या 8 मॅच गमावल्या होत्या. मुंबईने या सिझनमध्ये 13 पैकी 10 मॅच गमावल्या असून फक्त 3 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.