मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : धोनीचं डोकं चाचा चौधरीपेक्षा तेज, दुसऱ्याच बॉलला असा केला रोहितचा 'गेम'

IPL 2022 : धोनीचं डोकं चाचा चौधरीपेक्षा तेज, दुसऱ्याच बॉलला असा केला रोहितचा 'गेम'

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs CSK) यांच्यातल्या महामुकाबल्यामध्ये पहिल्याच ओव्हरला हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये डावखुऱ्या मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) मुंबईला दोन धक्के दिले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

नवी मुंबई, 21 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs CSK) यांच्यातल्या महामुकाबल्यामध्ये पहिल्याच ओव्हरला हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये डावखुऱ्या मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) मुंबईला दोन धक्के दिले. ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलला त्याने रोहित शर्माची (Rohit Sharma) विकेट घेतली, यानंतर पाचव्या बॉलला इशान किशन (Ishan Kishan) बोल्ड झाला, पण रोहित शर्माच्या विकेटआधी एमएस धोनीने (MS Dhoni) वापरलेल्या रणनितीमुळे त्याचं डोकं चाचा चौधरीपेक्षा जलद का आहे, हे पुन्हा दाखवून दिलं आहे.

टॉस हरल्यानंतर मुंबई इंडियन्सचे ओपनर रोहित शर्मा आणि इशान किशन ओपनिंगला आले. फिल्डिंगसाठी मैदानात उतरल्यानंतर एमएस धोनीने मुकेश चौधरीच्या कानात जाऊन काही तरी सांगितलं आणि यानंतर लगेचच मुंबईने रोहित शर्माच्या रुपात पहिली विकेट गमावली.

आयपीएलच्या या मोसमात मुंबई आणि चेन्नईच्या टीम संघर्ष करत आहेत. मुंबईने पहिले 6 सामने गमावले आहेत, तर चेन्नईला फक्त एकच विजय मिळाला आहे, त्यामुळे दोन्ही टीमनी त्यांच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत.

चेन्नईने मोईन अली आणि क्रिस जॉर्डन यांना बाहेर केलं आहे, त्यांच्याऐवजी ड्वॅन प्रिटोरियस आणि मिचेल सॅन्टनर यांना संधी देण्यात आली आहे. तर मुंबईने त्यांच्या टीममध्ये तीन बदल केले आहेत. टायमल मिल्स, मुरुगन अश्विन आणि फॅबियन एलन यांच्याऐवजी रिले मेरेडिथ, ऋतीक शौकीन आणि डॅनियल सॅम्स (Daniel Sams) यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम शेवटच्या म्हणजेच 10 व्या क्रमांकावर आहे, तर चेन्नई नवव्या क्रमांकावर आहे. सुरुवातीच्या 6 सामन्यांमध्येच केलेल्या या खराब कामगिरीमुळे दोन्ही टीमचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास अशक्य आहे.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Mumbai Indians, Rohit sharma