Home /News /sport /

IPL 2022 Auction : श्रेयस अय्यर होणार मालामाल, 3 आयपीएल टीम लावणार मोठी बोली

IPL 2022 Auction : श्रेयस अय्यर होणार मालामाल, 3 आयपीएल टीम लावणार मोठी बोली

आयपीएल स्पर्धेच्या आगामी सिझनपूर्वी (IPL 2022) मेगा ऑक्शन होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या ऑक्शनसाठी सर्व रणनीती तयार करण्यास सुरूवात केली आहे.

    मुंबई, 17 जानेवारी : आयपीएल स्पर्धेच्या आगामी सिझनपूर्वी (IPL 2022) मेगा ऑक्शन होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या ऑक्शनसाठी सर्व रणनीती तयार करण्यास सुरूवात केली आहे. या ऑक्शनमध्ये 3 टीमना कॅप्टनची निवड करायची आहे. या कॅप्टनपदासाठी त्यांची टीम इंडियातील मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ही पसंती आहे. त्यामुळे आगामी ऑक्शनमध्ये श्रेयस मालामाल होणार आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाईट राडयडर्स  (KKR) या तीन आयपीएल टीमना आगामी सिझनसाठी त्यांचा कॅप्टन निश्चित करायचा आहे. या सर्व  टीम श्रेयसवर बोली लावणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन आयपीएल टीम ऑक्शनपूर्वी तीन खेळाडूंची ड्राफ्टच्या माध्यमातून निवड करणार आहेत. या टीम श्रेयसची निवड करतील असं मानलं जात होतं. मात्र या दोन्ही टीम त्याला कॅप्टन करणार नसल्याने श्रेयसनं त्यांना नकार दिल्याचे वृत्त आहे.  अहमदाबाद टीमच्या  कॅप्टनपदासाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तर लखनऊ टीमच्या कॅप्टनपदासाठी केएल राहुलचे (KL Rahul) नाव आघाडीवर आहे. त्यामुळे श्रेयसनं आयपीएल लिलावात नाव नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीनंतर होणाऱ्या कॅप्टनचे नाव ठरले! वाचा BCCI कधी करणार घोषणा पंतनंतर होते अय्यरचे नाव  श्रेयस अय्यर आयपीएल 2018 च्या दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन बनला होता. त्याच्याच कॅप्टनसीखाली दिल्लीनं आयपीएल 2020 मध्ये फायनल गाठली होती. मागील सिझन सुरू होण्यापूर्वी श्रेयस जखमी झाल्यानं दिल्लीच्या मॅनेजमेंटनं ऋषभ पंतला कॅप्टन केले. यंदा देखील पंतनंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रेयसचे नाव दिल्लीच्या यादीमध्ये होते. मात्र त्यानं कॅप्टन होण्याचा आग्रह केल्यानं त्याला टीममधून बाहेर करण्यात आले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Shreyas iyer

    पुढील बातम्या