मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

....म्हणून CSK ची रवींद्र जडेजाला पहिली पसंती, माजी क्रिकेटरने धोनीची केली पोलखोल

....म्हणून CSK ची रवींद्र जडेजाला पहिली पसंती, माजी क्रिकेटरने धोनीची केली पोलखोल

Ravindra Jadeja with MS Dhoni

Ravindra Jadeja with MS Dhoni

चेन्नईच्या (CSK IPL Auction)यादीमधील विशेष बाब म्हणजे रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) कॅप्टन धोनीपेक्षा(MS Dhoni) अधिक रक्कम देऊन रिटेन करण्यात आलेले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 1 डिसेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022) साठी रिटेन झालेल्या खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं 4 खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), मोईन अली (Moeen Ali) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांचा समावेश आहे. चेन्नईच्या यादीमधील विशेष बाब म्हणजे रविंद्र जडेजाला कॅप्टन धोनीपेक्षा अधिक रक्कम देऊन रिटेन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान, एका माजी क्रिकेटरने यामागचे कारण सांगत धोनीची पोलखोल केली आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले की, आयपीएल 2022 रिटेन्शनमध्ये रवींद्र जडेजाला पहिल्या क्रमांकावर कायम ठेवण्याचा निर्णय महेंद्रसिंग धोनीचा होता. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी म्हणाले, “एमएस धोनीची जागा दुसरा कोणीही घेऊ शकत नाही. माझ्यासाठी तो नेहमीच माझा कर्णधार असतो. तो फ्रेंचायझीचा हृदय आणि आत्मा आहे. चाहतेही त्याला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

'मेन इन यलो' संघाचे कर्णधारपद स्वीकारण्याचे संकेत

जडेजाला पहिल्या क्रमांकावर कायम ठेवण्यामागे महेंद्रसिंग धोनीची शक्कल आहे. तसेच, रॉबिन उथप्पा आणि पार्थिव पटेल यांनीही धोनीच्या रणनीतीचे कौतुक केले आहे.

रॉबिन उथप्पाला वाटते की धोनीनेच रवींद्र जडेजाला पहिली निवड म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. धोनीला जडेजाचे मूल्य माहित आहे. असे सांगून उथप्पाला वाटते की जडेजा भविष्यातही CSK संघाचा कर्णधार म्हणून धोनीची जागा घेऊ शकतो. असा विश्वात त्याने यावेळी व्यक्त केला.

स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना उथप्पा म्हणाला, “मला खात्री आहे की एमएस धोनी स्वतः हे करत आहे. त्याला जडेजाचे युनिटमधील महत्त्व माहीत आहे. मला वाटते आणि मला जे समजते ते असे आहे की एमएस धोनी निवृत्त झाला तरीही जडेजा भविष्यात संघाचे नेतृत्व करू शकेल. त्याने रवींद्र जडेजाला तो हक्क दिला आहे.

धोनीच्या जागी रवींद्र जडेजा सीएसकेच्या कर्णधारपदी

भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल यानेही उथप्पाचे मताचे समर्थन केले. रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा कर्णधार असेल असे त्याला वाटते. पार्थिव पटेलनेही जडेजा हा हुशार खेळाडू असल्याचे सांगून शेवटी महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा जडेजाला 'मेन इन यलो' संघाचे कर्णधारपद स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Ipl 2022 auction, MS Dhoni, Ravindra jadeja