Home /News /sport /

LSG vs PBKS: ...म्हणून लखनऊने मनीष पांडेला दिला डच्चू, कारण आले समोर

LSG vs PBKS: ...म्हणून लखनऊने मनीष पांडेला दिला डच्चू, कारण आले समोर

Manish Pandey

Manish Pandey

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 45 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळवण्यात येत आहे. अशातच मुंबईला पराभूत करणाऱ्या लखनऊने टीममध्ये एकमेव बदल केला आहे. मनीष पांडेच्या (Manish Pandey) जागी आवेश खानला संधी दिली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 29 एप्रिल: आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 45 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळवण्यात येत आहे. पंजाबने टॉस जिंकला आहे. कॅप्टन मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. अशातच मुंबईला पराभूत करणाऱ्या लखनऊने टीममध्ये एकमेव बदल केला आहे. मनीष पांडेच्या (Manish Pandey) जागी आवेश खानला संधी दिली आहे. काय आहे मनीष पांडेला डच्चू देण्याचे कारण अनेक संधी देऊनही या खेळाडूच्या फलंदाजीत कोणतीही सुधारणा झाली नाही, त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने त्याला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवला. आयपीएल 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघासाठी मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेची कामगिरी अत्यंत खराब आहे. मनीष पांडेने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 14.67 च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ 88 धावा केल्या आहेत. या काळात मनीष पांडेची सर्वोत्तम धावसंख्या केवळ 38 धावा आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर मनीष पांडेला लखनऊ सुपर जायंट्स संघाने बाहेरचा रस्ता दाखवला. पंजाबविरुद्ध मॅचपूर्वी लखनऊला धक्का, टीमचे CEO कार अपघातात जखमी
  लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कर्णधार केएल राहुलने आयपीएल 2022 च्या 42 व्या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध त्याच्या संघात मोठा बदल केला आहे, मनीष पांडेच्या जागी आवेश खानला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिले आहे. मनीष पांडे मागील हंगामापर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल खेळत होता, त्यानंतर त्याला या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला होता. लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने मनीष पांडेला 4 कोटी 60 लाख म्हणजेच जवळपास 5 कोटी रुपयांना संघात समाविष्ट केले. 32 वर्षीय मनीष पांडेला आयपीएलचा भरपूर अनुभव आहे. या सामन्यापूर्वी त्याने आयपीएलच्या 156 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 3571 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत. स्ट्राइक रेट 122 आहे. त्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 276 सामन्यांत 32 च्या सरासरीने 6326 धावा केल्या आहेत. त्याने 3 शतके आणि 36 अर्धशतके केली आहेत. म्हणजेच त्याने 39 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. नाबाद 129 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. स्ट्राइक रेट 124 आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants, Punjab kings

  पुढील बातम्या