मुंबई, 23 मार्च : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. या मोसमापासून आयपीएल टीमची संख्या 2 ने वाढली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) या दोन टीम दाखल झाल्यामुळे आता आयपीएल टीमची संख्या 10 झाली आहे. लखनऊ सुपर जाएंट्स आयपीएल इतिहासातली सगळ्यात महागडी टीम आहे. लखनऊने केएल राहुलला (KL Rahul) टीमचा कर्णधार केलं आहे, तर गौतम गंभीर (Gautam Gambhir) या टीमचा मेंटर आहे. गौतम गंभीरने आयपीएल सुरू व्हायच्या आधी टीमचा कर्णधार केएल राहुलबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. गंभीरने पीटीआयला मुलाखत दिली.
'गौतम गंभीर कर्णधार म्हणून टीमचं मैदानात आणि मैदानाबाहेर नेतृत्व करेल. आमच्यासाठी राहुल एक बॅटर म्हणून गरजेचा आहे, जो नेतृत्वही करू शकतो. एक कर्णधार नाही जो बॅटिंग करू शकेल,' असं गंभीर म्हणाला.
'कर्णधाराला रिस्क घेणं शिकलं पाहिजे, राहुलला ठरवून धोके पत्करावे लागतील, कारण क्विंटन डिकॉक आमच्यासाठी विकेट कीपिंग करेल, त्यामुळे राहुल विकेट कीपिंगच्या जबाबदारीतून मुक्त असेल,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.
टीम इंडियावर लक्ष ठेवून तुम्ही आयपीएल खेळू शकत नाही. तुम्ही इकडे एक लीडर म्हणून पुढे जाऊ शकता, पण आयपीएल आपल्याला टीम इंडियाचं कर्णधार बनवेल, याची काहीच गॅरंटी नाही, असं वक्तव्य गंभीरने केलं.
केएल राहुलला टीम इंडियाचा भविष्यातला कर्णधार मानलं जात आहे. याच कारणामुळे त्याच्या आयपीएलमधल्या कॅप्टन्सीवर अनेकांचं लक्ष आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात राहुलने एक टेस्ट आणि तीन वनडेमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं, या चारही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्यामुळे राहुलच्या कॅप्टन्सीवर टीका झाली होती.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात लखनऊ सुपर जाएंट्स त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 28 मार्चला खेळणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होईल. लखनऊ सुपर जाएंट्सला आयपीएल सुरू होण्याआधीच धक्का लागला. इंग्लंडचा मार्क वूड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautam gambhir, Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants