Home /News /sport /

IPL 2022 : लखनऊ टीमचं नाव ठरलं, पुण्यालाच केलं कॉपी!

IPL 2022 : लखनऊ टीमचं नाव ठरलं, पुण्यालाच केलं कॉपी!

जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या मोसमात दोन नव्या टीम जोडल्या गेल्या आहेत. अहमदाबाद आणि लखनऊची टीम यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.

    मुंबई, 24 जानेवारी : जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या मोसमात दोन नव्या टीम जोडल्या गेल्या आहेत. अहमदाबाद आणि लखनऊची टीम यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. यातल्या लखनऊ टीमने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. या टीमचं नाव लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) असेल. या टीमचा मालकी हक्क आरपी संजीव गोयंका ग्रुपकडे आहे. लखनऊ टीमने सोशल मीडियावर चाहत्यांना नावाचा सल्ला द्यायची विनंती केली होती. यानंतर काही वेळातच टीमने नावाची अधिकृत घोषणा केली. लखनऊ टीमचे मालक संजीव गोयंका यांनी एक व्हिडिओ मेसेज शेयर केला. 'तुम्ही नावं सुचवलीत, याबाबत खूप धन्यवाद. लाखो चाहत्यांनी नव्या नावाबाबत सल्ला दिला, त्याआधारावर टीमचं नाव लखनऊ सुपर जायंट्स ठेवण्यात आलं आहे,' असं संजीव गोयंका म्हणाले. केएल राहुल (KL Rahul) लखनऊ टीमचा कर्णधार असेल, ज्याला टीमने 17 कोटी रुपयांना विकत घेण्यात आलं. याआधी राहुल पंजाबच्या टीमचा कर्णधार होता. या रकमेसह राहुल आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडूही बनला आहे. केएल राहुलने नुकतंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 3-0 ने पराभव झाला. राहुलशिवाय टीमने मार्कस स्टॉयनिसला 9.2 कोटी आणि रवी बिष्णोईला 4 कोटी रुपयांना विकत घेतलं. लखनऊ टीमआधी आरपीएसजी ग्रुपने 2017 साली पुण्याची फ्रॅन्चायजीही विकत घेतली होती. त्यावेळी टीमचं नाव रायजिंग पुणे सुपर जायंट्स होतं. एमएस धोनीने या टीमचं नेतृत्व केलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या