मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Live मॅचवेळी चाहत्याने सांगितली T20 वर्ल्ड कपची Playing 11, दोन अनोळखी चेहेरेही सामिल

Live मॅचवेळी चाहत्याने सांगितली T20 वर्ल्ड कपची Playing 11, दोन अनोळखी चेहेरेही सामिल

मॅचमधील काही फॅन मूव्हमेंट किंवा फॅन्सनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटरसाठी तयार केलेला फलक चर्चेचा विषय ठरतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

मॅचमधील काही फॅन मूव्हमेंट किंवा फॅन्सनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटरसाठी तयार केलेला फलक चर्चेचा विषय ठरतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

मॅचमधील काही फॅन मूव्हमेंट किंवा फॅन्सनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटरसाठी तयार केलेला फलक चर्चेचा विषय ठरतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

  मुंबई, 18 मे : भारतात क्रिकेटचे (Cricket) चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी (Hockey) असला तर प्रत्येकालाच हॉकीपेक्षा क्रिकेटबद्दल जास्त माहिती असते. अगदी टीममधील बेस्ट क्रिकेटरपासून ते त्यांच्या पर्सनल लाईफपर्यंत लोकांना माहीत असतं. अगदी गल्लीबोळातली मुलंही मॅच सुरू असली की क्रिकेट एक्सपर्ट (Cricket Expert) बनतात आणि त्यांची मतं नोंदवतात. क्रिकेट हा भारतात कायमच सर्वाधिक चर्चिला जाणारा आणि लोकप्रिय खेळ राहिला आहे.

  सध्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या फायनलला अगदी कमी दिवस उरल्याने फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही क्रिकेटवेडे तर आयपीएलची एकही मॅच मिस करत नाहीत. कोरोनाचे (Corona) निर्बंध हटवण्यात आल्याने अनेक जण ग्राउंडमध्ये जाऊन मॅच बघण्यास पसंती देतात. यावेळी मॅचमधील काही फॅन मूव्हमेंट किंवा फॅन्सनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटरसाठी तयार केलेला फलक चर्चेचा विषय ठरतात. असे छोटे-छोटे व्हिडिओ किंवा फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

  आयपीएल 2022 च्या 58 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capital) मॅच सुरू होती. या मॅचवेळी फॅन गॅलरीतील एका व्यक्तीच्या पोस्टरने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. हे पोस्टर टी-20 वर्ल्ड कपसंबंधी होतं. या वेळी टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होणार आहे. ज्यामध्ये भारतीय टीमही सहभागी होणार आहे. याआधी, भारत यूएईमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप (World Cup) जिंकावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे. हीच इच्छा या चाहत्याच्या पोस्टरमधून दिसून आली. तसंच त्याने त्याच्या आवडीची टीम निवडल्याचंही पाहायला मिळालं. क्रिकेट अड्डा डॉट कॉमनं या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केलंय.

  या चाहत्याने निवडलेल्या भारतीय टीममधील खेळाडू -

  त्या चाहत्याच्या मते, रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा कर्णधार असावा, दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) विकेटकीपर असावा. याशिवाय के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यझुवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, राहुल तेवतिया, ऋषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये समावेश करावा, असं त्यानं म्हटलंय.

  हे वाचा - IPL 2022 : Arjun Tendulkar चं आयपीएल पदार्पण होणार, रोहितने सांगितला मुंबईचा गेम प्लान!

  आता या चाहत्याने निवडलेल्या खेळाडूंपैकी प्रत्यक्षात टीम इंडियामध्ये किती खेळाडू सामील होतील आणि खेळतील, हे तर नंतरच कळेल. पण एकंदरीतच त्याच्या क्रिकेटप्रेमाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

  First published:

  Tags: Ipl 2022, T20 cricket