Home /News /sport /

IPL 2022 : आयपीएलच्या पुढच्या मोसमात 10 टीम, असा असणार नवीन फॉरमॅट

IPL 2022 : आयपीएलच्या पुढच्या मोसमात 10 टीम, असा असणार नवीन फॉरमॅट

आयपीएल 2022 (IPL 2022) साठी बीसीसीआय (BCCI) मोठी तयारी करत आहे. पुढच्या मोसमात आयपीएलच्या दोन टीम वाढणार आहेत, यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येतील, पण 10 टीम झाल्यामुळे टीमचा फॉरमॅटही बदलला जाणार आहे.

    मुंबई, 5 जुलै : आयपीएल 2022 (IPL 2022) साठी बीसीसीआय (BCCI) मोठी तयारी करत आहे. पुढच्या मोसमात आयपीएलच्या दोन टीम वाढणार आहेत, यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येतील, पण 10 टीम झाल्यामुळे टीमचा फॉरमॅटही बदलला जाणार आहे. आयपीएलचा हा मोसम 4 मे रोजी कोरोनामुळे स्थगित करण्यात आला, त्यानंतर आता उरलेल्या 31 मॅच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होणार आहेत. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार 2022 पासून नेहमीप्रमाणे राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये सामने होणार नाहीत. या 10 टीमना 5-5 च्या ग्रुपमध्ये विभागलं जाईल. प्रत्येक टीमला 8 लीग सामने खेळावे लागतील, यातले 4 सामने घरच्या मैदानात आणि 4 सामने बाहेर होतील. या फॉरमॅटमुळे आयपीएलच्या एकूण 74 मॅच होतील. सध्या हीच संख्या 60 एवढी आहे, म्हणजेच दोन टीम वाढल्यानंतरही फक्त 14 मॅचच जास्त होतील. 10 टीम झाल्यानंतर जर राऊंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा खेळवली गेली असती तर मॅचची संख्या 94 झाली असती. यासाठी जास्त वेळ लागला असता आणि परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबतही अडचणी निर्माण झाल्या असत्या. याशिवाय आयसीसीही आता प्रत्येक वर्षी मोठी स्पर्धा खेळवणार आहे, त्यामुळे बीसीसीआयसाठी राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये आयपीएलचं आयोजन करणं कठीण जाईल. वर्षाला 14 मॅच वाढल्यामुळे बीसीसीआयला जवळपास 800 कोटी रुपयांची अधिकची कमाई होईल. याशिवाय दोन नवीन टीममुळे 4 हजार कोटी रुपये मिळतील, असा अंदाज आहे. पुढच्या मोसमासाठी बीसीसीआय नवीन मीडिया राईट्ससाठीही टेंडर काढणार आहे, त्यातूनही उत्पन्न वाढेल, असा विश्वास बीसीसीआयला आहे. डिसेंबरमध्ये मेगा ऑक्शन आयपीएलच्या दोन नव्या टीम निश्चित झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शन (Mega Auction) होण्याची शक्यता आहे. यामध्ये पुन्हा नव्याने खेळाडूंवर बोली लागेल. प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करता येतील. या 4 खेळाडूंपैकी तीन भारतीय, एक परदेशी किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू असतील. बीसीसीआय लिलावादरम्यान टीमची सॅलरी पर्स म्हणजेच लिलावात खर्च करण्याची रक्कम वाढवणार आहे. पहिले एक टीम जास्तीत जास्त 85 कोटी रुपये खर्च करू शकत होती, पण यंदा मात्र टीमना 90 कोटी रुपये खर्च करता येतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Ipl

    पुढील बातम्या