मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीची 3 कारणं, पाहा Inside Story

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीची 3 कारणं, पाहा Inside Story

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पहिल्यांदाच 10 टीम खेळत आहेत. आयपीएल टीमची संख्या वाढवल्यामुळे प्रत्येक टीमना जुने खेळाडू रिलीज करावे लागले आणि लिलावात खेळाडूंवर बोली लावावी लागली. खेळाडू रिलीज करण्याचा सगळ्यात जास्त फटका मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) बसला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पहिल्यांदाच 10 टीम खेळत आहेत. आयपीएल टीमची संख्या वाढवल्यामुळे प्रत्येक टीमना जुने खेळाडू रिलीज करावे लागले आणि लिलावात खेळाडूंवर बोली लावावी लागली. खेळाडू रिलीज करण्याचा सगळ्यात जास्त फटका मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) बसला. आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईचा या मोसमात पहिल्या पाचही मॅचमध्ये पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे. 2007 टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचे कोच लालचंद राजपूत (Lalchand Rajput) यांनी मुंबईच्या खराब कामगिरीची कारणं सांगितली आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फॉर्ममध्ये नसणं ही त्यांची सगळ्यात मोठी कमजोरी असल्याचं राजपूत न्यूज18 सोबत बोलताना म्हणाले.

'मुंबईच्या टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मागच्या मोसमापर्यंत त्यांच्याकडे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेन्ट बोल्ट हे खेळाडू होते, यावेळी ते टीममध्ये नाहीत. एकाच वेळी एवढे सगळे महत्त्वाचे खेळाडू जाण्यामुळे टीम कमजोर झाली आहे. ही कमजोरी दूर करायला वेळ लागेल. रोहित शर्माही अपेक्षेप्रमाणे रन करत नाही, ज्यामुळे टीमची अडचण अजून वाढली आहे,' अशी प्रतिक्रिया राजपूत यांनी दिली.

बुमराहवर वाढला दबाव

ट्रेन्ट बोल्टच्या जाण्यामुळे जसप्रीत बुमराहवरचा (Jasprit Bumrah) दबाव वाढला आहे. मुंबईकडे आता एकच विकेट घेणारा बॉलर आहे, हे विरोधी टीमना माहिती आहे, त्यामुळे या टीम बुमराहला सांभाळून खेळत आहेत, त्यामुळे बुमराहला विकेट मिळत नाही. दुसरीकडे आपण सुरूवातीला विकेट घेतली नाही, तर टीमवर दबाव वाढतो, हे बुमराहलाही माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला आहे, असं वक्तव्य लालचंद राजपूत यांनी केलं.

स्पिनरची कमी

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये चांगल्या स्पिनरची कमी आहे. मागच्या वर्षी लेग स्पिनर राहुल (Rahul Chahar) चहरने बऱ्याच विकेट घेतल्या होत्या. चहरमुळे मुंबईला मागच्या मोसमांमध्ये मधल्या ओव्हरमध्येही विकेट घेण्यात यश यायचं, यावेळी असं होत नाहीये. राहुल चहरने मुंबई इंडियन्ससोबतच्या कामगिरीमुळेच टीम इंडियात स्थान मिळवलं होतं, असं राजपूत म्हणाले.

First published:

Tags: Cricket, Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma