Home /News /sport /

करो या मरो सामन्यात KKR साठी रसेल-बिलिंग्ज ठरले संकटमोचक, SRH समोर 178 धावांचं आव्हान

करो या मरो सामन्यात KKR साठी रसेल-बिलिंग्ज ठरले संकटमोचक, SRH समोर 178 धावांचं आव्हान

KKR vs SRH Live Score-Updates: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील IPL-2022 चा 61 वा सामना पुण्यातील MCA स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकात्याचे कर्णधारपद युवा श्रेयस अय्यरकडे तर हैदराबादचे नेतृत्व केन विल्यमसनकडे आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 14 मे : उमरान मलिकने (Umran Malik) पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली. या वेगवान गोलंदाजाने आयपीएल 2022 (IPL 2022) च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 3 बळी घेतले. परिणामी कोलकाता मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. सामन्यात (KKR vs SRH) केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने 20 षटकांत 6 बाद 177 धावा केल्या आहेत. त्यामुळे हैदराबादला 178 धावांचे लक्ष्य मिळाले. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाने हा सामना जिंकला तर केकेआरचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडणारा तिसरा संघ बनेल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आधीच शर्यतीतून बाहेर आहेत. गेल्या मोसमात केकेआरचा संघ उपविजेता ठरला होता. या सामन्यापूर्वी केकेआरने 12 सामन्यांत केवळ 5 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यात पराभव झाला आहे. हैदराबादविरुद्ध संघाची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने दुसऱ्याच षटकात संघाला मोठे यश मिळवून दिले. गेल्या सामन्यात चांगली खेळी खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरला त्याने 7 धावांवर बाद केले. यानंतर नितीश राणा आणि अजिंक्य रहाणे यांनी 48 धावांची भागीदारी करत संघाची धुरा सांभाळली. उमरानचे पहिल्याच षटकात 2 बळी उमरान मलिकने पहिल्याच षटकात केकेआरला दोन मोठे धक्के दिले. 8व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 16 चेंडूत 26 धावा करून राणा बाद झाला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर उमराने रहाणेलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शशांक सिंगने त्याचा अप्रतिम झेल सीमारेषेवर टिपला. त्याने 26 चेंडूत 28 धावा केल्या. यात 3 षटकार मारले. कर्णधार श्रेयस अय्यर अपयशी ठरला. तो 9 चेंडूत 15 धावा करून उमरान मलिकचा तिसरा बळी ठरला. रिंकू सिंग 5 धावा करून टी नटराजनचा बळी पडला. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 119 धावा होती. 94 धावांत 5 गडी बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल आणि सॅम बिलिंग्सने संघाची धुरा सांभाळली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान, रसेलच्या आयपीएलमध्ये 2 हजार धावा पूर्ण झाल्या. बिलिंग्स 34 धावा करुन भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 29 चेंडूंचा सामना केला. यात 3 चौकार आणि 1 षटकार मारला. रसेल 28 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. ऑफस्पिनर सुंदरच्या शेवटच्या षटकात त्याने 3 षटकार ठोकले. या षटकात 20 धावा झाल्या. सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती
    Published by:Rahul Punde
    First published:

    पुढील बातम्या