मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : विराटच्या जागी कोण होणार RCB चा नवा कॅप्टन? धोनीच्या सहकाऱ्याने सांगितलं नाव

IPL 2022 : विराटच्या जागी कोण होणार RCB चा नवा कॅप्टन? धोनीच्या सहकाऱ्याने सांगितलं नाव

विराट कोहलीने (Virat Kohli) आधीच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं (RCB) कर्णधारपद सोडलं आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम विराटसाठी कॅप्टन म्हणून अखेरचा होता.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 नोव्हेंबर : विराट कोहलीने (Virat Kohli) आधीच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं (RCB) कर्णधारपद सोडलं आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम विराटसाठी कॅप्टन म्हणून अखेरचा होता. आता तो आरसीबीकडून बॅटर म्हणूनच मैदानात उतरेल. कोहलीने कॅप्टन्सी सोडल्यानंतर आरसीबीचं नेतृत्व एबी डिव्हिलियर्सकडे (Ab de Villiers) जाईल, असं सांगण्यात येत होतं पण एबी डिव्हिलियर्सनेही सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यामुळे आता विराटऐवजी आरसीबीचा पुढचा कर्णधार कोण होणार, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) आयपीएल खेळलेल्या एस बद्रीनाथ (S Badrinath) याने आरसीबीचा पुढचा कॅप्टन कोण असेल, याचं उत्तर दिलं आहे. केएल राहुलकडे (KL Rahul) आरसीबीचं नेतृत्व जाऊ शकतं, असं भाकीत बद्रीनाथने केलं आहे.

याआधी पंजाब किंग्सची (Punjab Kings) टीम आपले चारही खेळाडू रिलीज करतील, असं वृत्त आलं होतं. आयपीएलच्या प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंजाब किंग्सने केएल राहुल, मयंक अग्रवाल, रवी बिष्णोई आणि अर्शदीप सिंग यांना रिटेन करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, पण केएल राहुलने टीमसोबत करार करायला नकार दिला.

IPL 2022 : केएल राहुलने केला पंजाबचा करेक्ट कार्यक्रम, चार सोडा एकही प्लेयर रिटेन करता येणार नाही!

केएल राहुल आयपीएल 2022 मध्ये पदार्पण करणाऱ्या दोन फ्रॅन्चायजीपैकी एक लखनऊचं नेतृत्व करू शकतो, असं वृत्तही प्रसिद्ध झालं होतं. या वृत्तानुसार लखनऊच्या टीमचा पुढच्या तीन मोसमांसाठी केएल राहुलसोबत करारही झाला आहे. आयपीएलच्या मागच्या 4 मोसमांमध्ये केएल राहुलची कामगिरी धमाकेदार झाली. राहुलने प्रत्येक मोसमात 550 पेक्षा जास्त रन केल्या.

First published: