Home /News /sport /

IPL 2022 KKR vs RR : राजस्थान रॉयल्सना टॉपवर जायची संधी, श्रेयसने टॉस जिंकला

IPL 2022 KKR vs RR : राजस्थान रॉयल्सना टॉपवर जायची संधी, श्रेयसने टॉस जिंकला

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals vs KKR) होत आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals vs KKR) होत आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. कोलकात्याने या सामन्यासाठी टीममध्ये एक बदल केला आहे. शिवम मावीचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे, त्यामुळे अमान खानला बाहेर बसावं लागत आहे. दुसरीकडे राजस्थानने त्यांच्या टीममध्ये तीन बदल केले आहेत. करुण नायर, ओबेड मकॉय आणि ट्रेन्ट बोल्ट टीममध्ये आले आहेत, त्यामुळे रस्सी व्हॅन डर डुसेन, जेम्स नीशम आणि कुलदीप सेन यांना डच्चू देण्यात आला आहे. आयपीएलच्या या मोसमात राजस्थानने 5 पैकी 3 मॅच जिंकल्या आहेत, तर 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे केकेआरने 3 मॅच जिंकल्या आणि 3 हरल्या. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान पाचव्या आणि केकेआर सहाव्या क्रमांकावर आहे, पण आजच्या सामन्यात राजस्थानचा विजय झाला तर त्यांना पहिल्या क्रमांकावर जायची संधी आहे. Live Score पाहण्यासाठी क्लिक करा राजस्थानची टीम जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, करुण नायर, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मेकॉय, युझवेंद्र चहल कोलकात्याची टीम व्यंकटेश अय्यर, एरॉन फिंच, आंद्रे रसेल, शेल्डन जॅकसन, सुनिल नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, KKR, Rajasthan Royals

    पुढील बातम्या