Home /News /sport /

IPL 2022 : KKR साठी करो या मरोची लढाई, लखनऊने टॉस जिंकला

IPL 2022 : KKR साठी करो या मरोची लढाई, लखनऊने टॉस जिंकला

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs LSG) यांच्यात महत्त्वाची लढत होत आहे. प्ले-ऑफचं आव्हान कायम ठेवण्यासाठी केकेआरला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.

    नवी मुंबई, 18 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs LSG) यांच्यात महत्त्वाची लढत होत आहे. प्ले-ऑफचं आव्हान कायम ठेवण्यासाठी केकेआरला हा सामना जिंकणं गरजेचं आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी लखनऊला हा सामना जिंकावा लागणार आहे. या मॅचमध्ये लखनऊचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. लखनऊने या सामन्यात टीममध्ये तीन बदल केले आहेत. कृणाल पांड्या दुखापतीमुळे खेळत नाहीये, तर दुष्मंता चमिरा आणि आयुष बदोणी यांना बाहेर करण्यात आलं आहे, त्यांच्याऐवजी मनन व्होरा, एव्हिन लुईस आणि कृष्णप्पा गौतम यांना संधी देण्यात आली आहे. तर केकेआरने टीममध्ये एक बदल केला आहे. दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झालेल्या अजिंक्य रहाणेऐवजी अभिजीत तोमर मैदानात उतरणार आहे. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये लखनऊ तिसऱ्या आणि केकेआर सहाव्या क्रमांकावर आहे. लखनऊने 13 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर केकेआरने 13 पैकी 6 मॅच जिंकल्या आणि 7 सामन्यांमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. या दोन्ही टीमची या मोसमातली लीग स्टेजची ही अखेरची मॅच आहे. Live Score पाहण्यासाठी क्लिक करा केकेआरची टीम व्यंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनिल नारायण, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती लखनऊची टीम क्विंटन डिकॉक, केएल राहुल, एव्हिन लुईस, दीपक हुड्डा, मनन व्होरा, मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिष्णोई
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, KKR, Lucknow Super Giants

    पुढील बातम्या