Home /News /sport /

IPL Auction आधी दोन टीमनी उठवला BCCI विरुद्ध आवाज, लिलावाबद्दल म्हणाल्या...

IPL Auction आधी दोन टीमनी उठवला BCCI विरुद्ध आवाज, लिलावाबद्दल म्हणाल्या...

आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी रिटेन (IPL Retention 2022) केलेल्या खेळाडूंची मंगळवारी घोषणा केली. या टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले आहेत. यानंतर आता दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद प्रत्येकी 3-3 खेळाडू विकत घेईल, त्यानंतर जानेवारी महिन्यात उरलेल्या खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2022) होईल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 2 डिसेंबर : आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी रिटेन (IPL Retention 2022) केलेल्या खेळाडूंची मंगळवारी घोषणा केली. या टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले आहेत. यानंतर आता दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद प्रत्येकी 3-3 खेळाडू विकत घेईल, त्यानंतर जानेवारी महिन्यात उरलेल्या खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2022) होईल. पण आता आयपीएलच्या दोन टीमनी या लिलावावरच आक्षेप घेतला आहे. आम्ही गेली कित्येक वर्ष खेळाडू शोधत आहोत आणि त्यांना तयार करत आहोत, त्यामुळे त्यांचं टीममधून बाहेर जाणं एका धक्क्यासारखं आहे. बीसीसीआयला (BCCI) यात बदल करण्याची गरज आहे, असं या दोन टीमचं म्हणणं आहे. आयपीएलचा 2022 सालचा मोसम 8 ऐवजी 10 टीमचा असेल. मेगा ऑक्शनची आता गरज आहे का नाही, याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे, असं वक्तव्य केकेआरचे (KKR) सीईओ वेंकी मैसूर यांनी केलं आहे. क्रिकईन्फोशी बोलताना मैसूर म्हणाले, 'येणाऱ्या काळात खेळाडूंसाठी ड्राफ्ट बनवले जाऊ शकतात, तुम्ही त्यांना ट्रेड करू शकतात किंवा त्यांना लोनवर देऊ शकता. फ्रॅन्चायजींना मोठ्या काळासाठी टीम बनवण्याची परवानगी मिळू शकते.' केकेआरने यंदा आंद्रे रसेल, सुनिल नारायण, व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना रिटेन केलं. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचे सह-मालक पार्थ जिंदल यांनीही मेगा ऑक्शन सारख्या गोष्टी टाळता येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना जिंदल म्हणाले, 'श्रेयस अय्यर, शिखर धवन, कागिसो रबाडा, आर.अश्विन यांच्यासारखे खेळाडू सोडून जाणं हृदयद्रावक होतं. आयपीएलच्या नियमांमुळे असं करावं लागलं, पण याकडे लक्ष द्यायची गरज आहे.' दिल्लीने ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि एनरिक नॉर्किया यांना रिटेन केलं आहे. 'तुम्ही एक टीम बनवता, युवा खेळाडूंना संधी देता, त्यानंतर त्यांच्यासाठी संधी उपलब्ध होतात, ते काऊंटी आणि आपल्या देशासाठी खेळतात, पण तीन वर्षांनंतर ते तुमच्यासोबत राहत नाहीत,' असं पार्थ जिंदल यांनी सांगितलं. तर दुसरीकडे वेंकी मैसूर यांनीही असंच मत मांडलं. 'आमची स्वत:ची अकादमी आहे. आमच्याकडे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्काऊट स्ट्रक्चर आहे. आमचे 8 अनकॅप खेळाडू टीम इंडियाकडून खेळले, असं 2018 साली मला कोणीतरी सांगितलं. त्यामुळे अशांचा गौरव केलं जायची गरज आहे,' असं मैसूर म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या