Home /News /sport /

IPL 2022 : हार्दिकने करण जोहरला विकत घेतलं का? 'कॉफी'च्या भुताने पुन्हा डोकं वर काढलं!

IPL 2022 : हार्दिकने करण जोहरला विकत घेतलं का? 'कॉफी'च्या भुताने पुन्हा डोकं वर काढलं!

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) त्यांच्या मैत्रीमुळे ओळखले जातात. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) हे दोघं वेगवेगळ्या टीमचे कर्णधार आहेत.

    मुंबई, 4 मे : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) त्यांच्या मैत्रीमुळे ओळखले जातात. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) हे दोघं वेगवेगळ्या टीमचे कर्णधार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पहिल्या क्रमांकावर तर केएल राहुलची (KL Rahul) लखनऊ सुपर जाएंट्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही खेळाडू आता क्रिकेट नाही तर दुसऱ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. करण जोहर (Karan Johar) याने त्याचा कॉफी विथ करण (Koffee With Karan) हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 वर्षांपूर्वी हे दोन्ही खेळाडू या शो मध्ये आले होते. महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यातून परत बोलावण्यात आलं, तसंच बीसीसीआयने त्यांचं निलंबनही केलं. करण जोहरने कॉफी विथ करण या शोचा सातवा मोसम येणार नाही, याची घोषणा केली, त्यानंतर चाहते हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं नाव घ्यायला लागले. हार्दिक पांड्याने करण जोहरला विकत घेतलं का? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. तर हार्दिक आणि राहुल पृथ्वीवरच्या सगळ्यात आनंदी व्यक्ती असतील, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या चाहत्याने दिली. करण जोहरच्या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर बीसीसीआयने राहुल आणि हार्दिक यांना 20-20 लाख रुपयांचा दंडही केला. तसंच वाद वाढल्यानंतर करण जोहरने हा एपिसोड काढून टाकण्याचाही निर्णय घेतला. काही काळानंतर हार्दिक आणि राहुल यांचं टीम इंडियात पुनरागमन झालं. आयपीएल 2022 मध्ये एकूण 10 टीम मैदानात उतरल्या आहेत. यात गुजरात आणि लखनऊ पहिल्यांदाच खेळत आहेत. गुजरातची टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Hardik pandya, Ipl 2022, Karan Johar, Kl rahul

    पुढील बातम्या