Home /News /sport /

IPL 2022 : चार शतकांसह Jos Buttler ने घडवला इतिहास, दिग्गजांनाही दिली धोबीपछाड

IPL 2022 : चार शतकांसह Jos Buttler ने घडवला इतिहास, दिग्गजांनाही दिली धोबीपछाड

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये जॉस बटलरची (Jos Buttler) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. आरसीबीविरुद्धच्या (Rajasthan Royals vs RCB) या सामन्यात बटलरने वादळी शतक केलं.

    मुंबई, 27 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये जॉस बटलरची (Jos Buttler) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. आरसीबीविरुद्धच्या (Rajasthan Royals vs RCB) या सामन्यात बटलरने वादळी शतक केलं, त्याने 60 बॉलमध्ये नाबाद 106 रनची खेळी केली, यामध्ये 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातलं बटलरचं हे चौथं शतक आहे. बटलरच्या या शतकामुळे राजस्थान आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे, तर आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये शतक करणारा बटलर सहावा खेळाडू आहे. याआधी सेहवाग, वॉटसन, ऋद्धीमान साहा, मुरली विजय, रजत पाटीदार यांनी प्ले-ऑफमध्ये शतकं केली होती. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये बटलर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक 6 शतकं क्रिस गेलच्या नावावर आहेत. तर विराट कोहली आणि बटलरने प्रत्येकी 5-5 शतकं केली आहेत, तसंच आयपीएलमध्ये एकाच मोसमात सर्वाधिक 4 शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) विक्रमाचीही बटलरने बरोबरी केली आहे. विराटनेही 2016 आयपीएलमध्ये 4 शतकं केली होती. बटलरने गाठला 800 चा आकडा जॉस बटलरने आयपीएलच्या मोसमात 800 रनचा टप्पा पार केला आहे. 16 सामन्यांमध्ये त्याने 150.64 च्या स्ट्राईक रेटने आणि 58.43 च्या सरासरीने 818 रन केले आहेत, यात 4 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. बटलरने या मोसमात 78 फोर आणि 44 सिक्स ठोकल्या. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक रन करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे विराटने 2016 च्या आयपीएलमध्ये 973 रन केले होते. तर डेव्हिड वॉर्नर (David Warner) या यादीत 848 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरचा विक्रम मोडायला बटलरला आणखी 31 रनची तर विराटचा विक्रम मोडायला 156 रनची गरज आहे, पण विराटचा विक्रम मोडणं बटलरला कठीण आहे. 29 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल फायनल होणार आहे, या सामन्यात बटलर पुन्हा एकदा मैदानात उतरेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या