मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Mumbai Indiansला पराभूत करताच पंजाबच्या कोचने मास्टर ब्लास्टर सचिनचे धरले पाय

Mumbai Indiansला पराभूत करताच पंजाबच्या कोचने मास्टर ब्लास्टर सचिनचे धरले पाय

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील आणखी एक मॅच गमावली आहे.  यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये पंजाबच्या कोचने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पाय धरल्याचे दिसत आहे.

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील आणखी एक मॅच गमावली आहे. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये पंजाबच्या कोचने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पाय धरल्याचे दिसत आहे.

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील आणखी एक मॅच गमावली आहे. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये पंजाबच्या कोचने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पाय धरल्याचे दिसत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 14 एप्रिल: मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील आणखी एक मॅच गमावली आहे. पुण्यात बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा पंजाब किंग्जनं (MI vs PBKS) 12 रननं पराभव केला. मुंबईचा हा या सिझनमधील सलग पाचवा पराभव असून पहिला विजय मिळवण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. अशातच सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये पंजाबचे कोच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पाय धरताना दिसत आहेत.

सामन्यानंतर क्रिकेटच्या मैदानात काहीसे वेगळं पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिका संघाचे दिग्गज खेळाडू आणि जगभरातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होडस सचिन तेंडुलकरच्या (Jonty Rhodes And Sachin Tendulkar) पाया पडण्यासाठी खाली वाकला. तेवढ्यात सचिनने लगेच खाली झुकत त्याचे हात पकडले. काही सेकंद ऱ्होड्स त्याच्या पाया पकडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु सचिननेही त्याला पाया पडू दिल्या नाहीत. त्यांच्या याच क्षणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

वाचा-दीपक चाहर IPLसह टी 20 वर्ल्डकपलाही मुकण्याची शक्यता, समोर आली मोठी अपडेट

जाँटी ऱ्होड्स दीर्घ काळापर्यंत मुंबई इंडियन्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होता. तो संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होता. 2017 मध्ये त्याने मुंबईची साथ सोडली होती. तो आता पंजाब संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. सचिन मुंबई संघाचा मार्गदर्शक आहे. पंजाबचा प्रशिक्षक अनिल कुंबळेशीही त्याने थोडा वेळ चर्चा केली. यानंतर जेव्हा ऱ्होड्सची वेळ आली, तेव्हा ऱ्होड्सने सचिनशी हातमिळवणी करायची सोडून, त्याचे पाय पकडून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच सचिनने त्याला रोखले.

जॉन्टी ऱ्होड्सची गणना जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. तो दक्षिण आफ्रिकेचा हुकमी खेळाडू होता आणि त्याने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरविरुद्ध अनेक सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये जॉन्टी यापूर्वी मुंबई इंडियन्ससोबत होता, त्यामुळे दोघांचं चांगलंच बाँडिंग आहे.

वाचा-कॅमेरामनने मिस्ट्री गर्लची बनवली लाईफ, रेड टॉपमधील ती RCB फॅन्स रातोरात झाली स्टार

आयपीएलमधली (IPL) सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा मैदानात (IPL 2022) संघर्ष करताना दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या पहिल्या 4 सामन्यांपैकी सगळ्या मॅचमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. मुंबईला या हंगामात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.

वाचा-सूर्यकुमार यादव OUT झाल्याने आकाश अंबानी निराश, व्हायरल होतीय रिअ‍ॅक्शन

यापूर्वी 2014 मध्ये, इंग्लंडमध्ये एमएससी विरुद्ध रेस्ट ऑफ वर्ल्ड सामन्यादरम्यान, असेच दृश्य पाहायला मिळाले होते. त्यानंतर सचिन एमसीसीकडून खेळला. उर्वरित जागतिक संघाकडून खेळणारा भारतीय फलंदाज युवराज सिंगने सचिनला पायाला स्पर्श करून नमस्कार केला होता.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Mumbai Indians