Home /News /sport /

IPL 2022 : Hardik कॅप्टन होणार! Mumbai Indians ने सोडलं तर ही टीम देणार साथ

IPL 2022 : Hardik कॅप्टन होणार! Mumbai Indians ने सोडलं तर ही टीम देणार साथ

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलच्या (IPL Auction 2022) या मोसमात संघर्ष करताना दिसला. संपूर्ण मोसमात हार्दिकने बॉलिंग केली नाही, तसंच त्याला बॅटिंगमध्येही अपयश आलं.

    मुंबई, 30 ऑक्टोबर : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलच्या (IPL Auction 2022) या मोसमात संघर्ष करताना दिसला. संपूर्ण मोसमात हार्दिकने बॉलिंग केली नाही, तसंच त्याला बॅटिंगमध्येही अपयश आलं. 2019 साली झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिक फार बॉलिंग करताना दिसला नाही. यानंतर आता मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी हार्दिकला रिटेन करणार नसल्याचं वृत्त समोर येत आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमात 4 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी बीसीसीआयने फ्रॅन्चायजींना दिली आहे. त्यामुळे मुंबईने रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर इशान किशन किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एक जण मुंबईचा चौथा रिटेन केलेला खेळाडू असेल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आयपीएलच्या पुढच्या मोसमापासून (IPL 2022) 8 ऐवजी 10 टीम मैदानात उतरतील. नव्या टीममध्ये अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊचा (Lucknow) समावेश आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला अहमदाबादच्या टीममध्ये स्थान मिळू शकतं. हार्दिक पांड्या गुजरातचा आहे, तसंच तो स्थानिक क्रिकेटही बडोद्याकडून खेळतो, त्यामुळे त्याला अहमदाबादच्या टीमचा कर्णधारही होऊ शकतो. अहमदाबादची टीम हार्दिक पांड्याशिवाय केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनाही टीममध्ये घेण्याबाबत विचार करत असल्याचं बोललं जातंय. अय्यर मागच्या मोसमात पंजाब किंग्सचा तर दिल्लीचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे सुरुवातीचा मोसम मुकावं लागलं, यानंतर ऋषभ पंतकडे दिल्लीचं नेतृत्व गेलं. आता राहुल आणि अय्यर त्यांच्या सध्याच्या आयपीएल टीमला सोडण्याच्या तयारीत आहेत. केएल राहुलने आयपीएलच्या या मोसमात 600 पेक्षा जास्त रन केले. IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल, 4 खेळाडू रिटेन करता येणार पण... BCCI ची घोषणा लखनऊची नजर वॉर्नर-रैनावर आयपीएलच्या या मोसमात सनरायजर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कॅप्टन्सीवरून हटवलं, यानंतर त्याला टीममधूनही डच्चू देण्यात आला. आता आपण नव्या टीमकडून खेळणार असल्याचं वॉर्नरने स्पष्ट केलं. लखनऊची टीम डेव्हिड वॉर्नरला कॅप्टन करण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर प्रदेशकडून स्थानिक क्रिकेट खेळणारे सुरेश रैना आणि भुवनेश्वर कुमारही लखनऊच्या टीममध्ये दिसू शकतात. सुरेश रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो, पण यावर्षी चेन्नईने त्याला फायनलसह अनेक मॅचमध्ये खेळवलं नाही. आरपीएसजी ग्रुपने (RPSG Group) लखनऊची टीम तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतली, तर सीव्हीसी कॅपिटलला (CVC Capital) अहमदाबादची टीम 5,166 कोटी रुपयांना मिळाली. 4 खेळाडू रिटेन करता येणार आयपीएलच्या जुन्या टीमना प्रत्येकी 4 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. तर नव्या दोन टीम लिलावाआधी 3 खेळाडू विकत घेऊ शकते. या मोसमापर्यंत प्रत्येक टीम खेळाडूंवर 85 कोटी रुपये खर्च करू शकत होती, हीच रक्कम आता 90 कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे. IPL 2022 Auction : 'अहमदाबाद'साठी आग्रही असणारा अदानी ग्रुप क्लीन बोल्ड, या कंपनीचा शेवटच्या बॉलवर सिक्स!
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या