Home /News /sport /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सनी सोडून दिल्यावर हार्दिक झाला भावुक, शेयर केला Emotional Video

IPL 2022 : मुंबई इंडियन्सनी सोडून दिल्यावर हार्दिक झाला भावुक, शेयर केला Emotional Video

Hardik Pandya

Hardik Pandya

आयपीएल 2022 (IPL 2022) साठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रिटेन केलेलं नाही. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईने कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) 4 जणांना टीममध्ये कायम ठेवलं आहे.

  मुंबई, 2 डिसेंबर : आयपीएल 2022 (IPL 2022) साठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रिटेन केलेलं नाही. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईने कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) 4 जणांना टीममध्ये कायम ठेवलं आहे. मंगळवारी सगळ्या 8 आयपीएल टीमना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याचा अखेरचा दिवस होता. यात 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना रिटेन केलं. आता दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद प्रत्येकी 3-3 खेळाडूंना विकत घेऊ शकते, यानंतर पुढच्या महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. हार्दिक पांड्या सध्या फिटनेसच्या समस्येमुळे त्रस्त आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्येही हार्दिकची कामगिरी निराशाजनक झाली. मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'मी या आठवणी आयुष्यभर लक्षात ठेवेन. हे क्षण मी आयुष्यभर स्वत:सोबत घेऊन चालेन. मी जी मैत्री केली आहे, जी नाती तयार केली आहेत, जे लोक आणि प्रशंसक आहेत, मी त्यांचा आभारी आहे. मी फक्त व्यक्ती नाही, तर खेळाडू म्हणून मोठा झालो आहे. मी इकडे युवा म्हणून मोठी स्वप्न घेऊन आलो होतो. आम्ही एकत्र जिंकलो, एकत्र हरलो आणि सोबत भांडलोही,' असा इमोशनल मेसेज हार्दिकने पोस्ट केला आहे.
  मुंबई इंडियन्ससोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे, या टीमसाठी माझ्या मनात नेहमी खास स्थान असेल, असंही हार्दिक म्हणाला. मुंबई इंडियन्सने नव्या मोसमासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कायरन पोलार्डला (Kieron Pollard) टीममध्ये स्थान दिलं आहे. आयपीएल 2022 मध्ये 10 टीम मैदानात उतरणार आहे, त्यामुळे मॅचची संख्याही 60 वरून 74 होणार आहे. मागच्याच महिन्यात लखनऊ आणि अहमदाबादच्या टीम आयपीएलशी जोडल्या गेल्या आहेत. 2022 सालची आयपीएल भारतामध्येच होईल, असं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction

  पुढील बातम्या