Home /News /sport /

IPL 2022 : वादग्रस्त DRS मुळे भडकला Mathew Wade, हेल्मेट फेकलं, बॅटही आपटली, VIDEO

IPL 2022 : वादग्रस्त DRS मुळे भडकला Mathew Wade, हेल्मेट फेकलं, बॅटही आपटली, VIDEO

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पुन्हा एकदा डीआरएसचा (DRS) वाद झाला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेड (Mathew Wade) चांगलाच संतापला.

    मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पुन्हा एकदा डीआरएसचा (DRS) वाद झाला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेड (Mathew Wade) चांगलाच संतापला. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर त्याने हेल्मेट फेकून दिलं, तसंच बॅटही आपटली. मॅथ्यू वेडच्या या रौद्ररुपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर आरसीबीने गुजरातला पहिला धक्का दिला. शुभमन गिल एक रनवर आऊट झाला, ग्लेन मॅक्सवेलने त्याचा अफलातून कॅच पकडला, पण ऋद्धीमान साहाने दुसऱ्या बाजूने आक्रमण सुरूच ठेवलं. गिलची विकेट गेल्यानंतर मॅथ्यू वेड मैदानात उतरला. मॅथ्यू वेडने या सामन्यात उत्कृष्ट सुरूवात केली. जॉश हेजलवूडच्या बॉलिंगवर त्याने खणखणीत शॉट मारले, पण मॅक्सवेलने त्याला एलबीडब्ल्यू केलं. 13 बॉलमध्ये 2 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने त्याने 16 रन केले. मॅक्सवेलच्या बॉलिंगवर वेडने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, यानंतर आरसीबीने अपील केलं तेव्हा अंपायरने त्याला आऊट दिलं. अंपायरच्या या निर्णयानंतर क्षणाचाही विलंब न घालवता वेडने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये बॉलने बॅटजवळून जाताना दिशा बदलल्याचं दिसत होतं, पण अल्ट्राएजमध्ये कोणताही स्पाईक दिसला नाही, यामुळे थर्ड अंपायरने मैदानातल्या अंपायरचा आऊटचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. थर्ड अंपायरच्या या निर्णयानंतर मॅथ्यू वेडचा पारा चढला. यानंतर डग आऊट जवळ वेडने मॅक्सवेलला याबाबत स्पष्टीकरणही दिलं. पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर गुजरातने 20 ओव्हरमध्ये 168/5 एवढा स्कोअर केला. हार्दिक पांड्याने 47 बॉलमध्ये नाबाद 62 रन केले. मिलर 25 बॉलमध्ये 34 आणि ऋद्धीमान साहा 22 बॉलमध्ये 31 रन करून आऊट झाला. राशिद खान 6 बॉलमध्ये 19 रनवर नाबाद राहिला. प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, RCB

    पुढील बातम्या