मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : विराटच्या अर्धशतकानंतर अनुष्काचं जोरदार सेलिब्रेशन, Video Viral

IPL 2022 : विराटच्या अर्धशतकानंतर अनुष्काचं जोरदार सेलिब्रेशन, Video Viral

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीचा (Gujarat Titans vs RCB) 6 विकेटने पराभव केला, पण आरसीबी आणि टीम इंडियाच्या चाहत्यांना या मॅचमुळे नक्कीच दिलासा मिळाला असेल, कारण विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात अर्धशतक केलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीचा (Gujarat Titans vs RCB) 6 विकेटने पराभव केला, पण आरसीबी आणि टीम इंडियाच्या चाहत्यांना या मॅचमुळे नक्कीच दिलासा मिळाला असेल, कारण विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात अर्धशतक केलं. आयपीएलच्या या हंगामातलं विराटचं हे पहिलंच अर्धशतक आहे. तसंच आयपीएलच्या 15 इनिंगनंतर विराटला पहिलं अर्धशतक करता आलं आहे. इतक्या सामन्यांनंतर विराटने अर्धशतक केल्यामुळे त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) जोरदार सेलिब्रेशन केलं. विराटचं आयपीएलमधलं हे 43 वे अर्धशतक आहे.

33 वर्षांच्या विराटने आरसीबीची बॅटिंग सुरू असताना 13व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर एक रन काढून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतर विराटने प्रेक्षकांकडे बघून बॅट वर केली. विराटची ही खेळी बघून स्टॅण्डमध्ये बसलेली अनुष्का शर्मा उभी राहिली आणि जल्लोष करायला लागली. टाळ्या वाजवून ती विराटला चीअर करत होती, तसंच तिच्या चेहऱ्यावर हास्यही होतं.

विराटच्या अर्धशतकानंतर काही वेळातच अनुष्काच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विराट कोहलीने (Virat Kohli) 53 बॉलमध्ये 58 आणि रजत पाटीदारने (Rajat Patidar) 32 बॉलमध्ये 52 रन केले, ज्यामुळे आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 170/6 एवढा स्कोअर केला.

14 इनिंगनंतर विराटने आयपीएलमध्ये त्याचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. 2010 नंतर कोहलीला अर्धशतकासाठी पहिल्यांदाच एवढा वेळ लागला आहे. याआधी 2009-10 साली विराटला अर्धशतकासाठी 18 इनिंग वाट पाहावी लागली होती. आयपीएलमधलं विराटचं हे 43 वे अर्धशतकं होतं, तसंच त्याच्या नावावर 5 शतकंही आहेत. 48 वेळा त्याने 50 पेक्षा जास्त रनची खेळी केली आहे.

विराट कोहलीने सुरूवातीलाच धमाका केला. मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) पहिल्याच ओव्हरमध्ये कोहलीने 2 फोर मारले. विराटने या आयपीएलच्या 10 मॅचमध्ये 20.67 च्या सरासरीने आणि 116.25 च्या स्ट्राईक रेटने 186 रन केले आहेत. आयपीएलच्या या हंगामात विराट लागोपाठ दोन वेळा गोल्डन डकवरही आऊट झाला आहे.

First published:

Tags: Anushka sharma, Gujarat Titans, Ipl 2022, RCB, Virat kohli