Home /News /sport /

IPL 2022 : गुजरातला मिळालं प्ले-ऑफचं तिकीट, लखनऊ 82 रनवर ऑलआऊट!

IPL 2022 : गुजरातला मिळालं प्ले-ऑफचं तिकीट, लखनऊ 82 रनवर ऑलआऊट!

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) प्ले-ऑफमध्ये (IPL Play off) पोहोचणारी गुजरात टायटन्स पहिली टीम ठरली आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात गुजरातचा (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) 62 रनने विजय झाला आहे.

    पुणे, 10 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) प्ले-ऑफमध्ये (IPL Play off) पोहोचणारी गुजरात टायटन्स पहिली टीम ठरली आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात गुजरातचा (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) 62 रनने विजय झाला आहे. गुजरातने दिलेल्या 145 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊचा 13.5 ओव्हरमध्ये फक्त 82 रनवर ऑल आऊट झाला. राशिद खानने (Rashid Khan) 3.5 ओव्हरमध्ये 24 रन देत 4 विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाळ आणि साई किशोर यांना 2-2 विकेट मिळाल्या. मोहम्मद शमीला एक विकेट घेण्यात यश आलं. लखनऊकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक 27 रन केल्या तर 11व्या क्रमांकावर खेळणाऱ्या आवेश खानने 12 रन केले. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 144/4 एवढा स्कोअर केला. शुभमन गिलने नाबाद 63, मिलरने 26 आणि राहुल तेवातियाने नाबाद 22 रनची खेळी केली. आवेश खानने सर्वाधिक 2 आणि मोहसीन खान, जेसन होल्डरला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. लखनऊविरुद्धच्या या विजयासोबतच गुजरात पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, सोबतच प्ले-ऑफमध्ये पोहोचणारीही ही पहिलीच टीम ठरली आहे. गुजरातने 12 पैकी 9 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊने 12 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 4 सामन्यांमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Lucknow Super Giants

    पुढील बातम्या