Home /News /sport /

IPL 2022 : मुंबई इंडियन्स म्हणजे विरोधी टीमला 'लॉटरी'च!, एक-दोन नाही तिसऱ्यांदा झाला हा रेकॉर्ड

IPL 2022 : मुंबई इंडियन्स म्हणजे विरोधी टीमला 'लॉटरी'च!, एक-दोन नाही तिसऱ्यांदा झाला हा रेकॉर्ड

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या सातही सामन्यांमध्ये मुंबईला पराभावाचा धक्का बसला आहे.

    मुंबई, 24 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या सातही सामन्यांमध्ये मुंबईला पराभावाचा धक्का बसला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या बॉलिंग आणि बॅटिंगनेही निराशा केली आहे, ज्यामुळे टीमची ही अवस्था झाली आहे. आतापर्यंत या आयपीएलमध्ये 4 शतकं झाली आहेत, यातली 3 शतकं खेळाडूंनी मुंबईविरुद्धच्याच मॅचमध्ये झळकावली आहेत. या आयपीएलमध्ये लखनऊचा केएल राहुल (KL Rahul) आणि राजस्थानच्या जॉस बटलरने (Jos Buttler) प्रत्येकी 2-2 शतकं केली, यातली राहुलची दोन्ही शतकं आणि बटलरचं एक शतक मुंबईविरुद्ध आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात राहुलने 62 बॉलमध्ये नाबाद 103 रन केले, यात 12 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. याआधीही 16 एप्रिलला झालेल्या सामन्यातही राहुलने मुंबईविरुद्ध शतक केलं. त्या सामन्यात राहुलने 60 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 9 फोरच्या मदतीने नाबाद 103 रन केले होते. ही मॅच लखनऊने 18 रनने जिंकली. राजस्थानच्या जॉस बटलरने मुंबई इंडियन्सविरुद्ध 68 बॉलमध्ये 100 रन केले, यात त्याने 11 फोर आणि 5 सिक्स ठोकले. बटलरच्या या खेळीमुळे राजस्थानचा 23 रनने विजय झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Kl rahul, Mumbai Indians

    पुढील बातम्या