मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रवी शास्त्रींनी सांगितला पुढचा प्लॅन, टीम इंडियानंतर 'या' टीमचा कोच होण्यास तयार

रवी शास्त्रींनी सांगितला पुढचा प्लॅन, टीम इंडियानंतर 'या' टीमचा कोच होण्यास तयार

रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ आता संपला आहे. मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढं काय करणार या प्रश्नाला शास्त्रीांनी उत्तर दिलं आहे.

    मुंबई, 15 नोव्हेंबर : रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ आता संपला आहे. ते 2017 पासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात दोन वेळा टेस्ट सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. पण, त्यांना आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद जिंकण्यात अपयश आले. नुकत्याच संपलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढं काय करणार या प्रश्नाला शास्त्रीांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी आयपीएल टीमचा कोच होण्यास तयार असल्याचं जाहीर केलं आहे. 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्रींनी पुढचा प्लॅन सांगितला. 'मला आयपीएल टीमचा कोच होण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की स्वीकारेन. यात कोणतंही दुमत नाही. मी आजवर हे काम कधीही केलेलं नाही. ही आव्हान स्विकारण्यास मला आवडेल. मी त्या दिशेनं नक्की विचार करेन.' असं शास्त्रींनी यावेळी सांगितलं. टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर आयपीएल स्पर्धेवर टीका होत असताना त्यांनी आयपीएलचा जोरदार बचाव केला आहे. 'आयपीएल स्पर्धा ही अतिशय आवश्यक आहे. या विषयावर लोकं काय विचार करतात याची मी पर्वी करत नाही. आयपीएलमधून मिळणारा पैसा क्रिकेटचे अन्य फॉर्मेट टिकवण्यासाठी आवश्यक आहे. स्थानिक पातळीवरी क्रिकेट जिवंत ठेवण्यास याचा पैसा उपयोगी आहे.' असं शास्त्रींनी सांगितलं. T20 World Cup: ऑस्ट्रेलियन कॅप्टनची वॉर्नरबद्दलची भविष्यवाणी खरी, 2 महिन्यांपूर्वी म्हणाला होता... अहमदाबाद टीमचे कोच होणार? यापूर्वी माध्यमांमधील  रिपोर्टनुसार अहमदाबाद फ्रँचायझीनं शास्त्री यांच्याशी संपर्क केला आहे.  शास्त्रींसह टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरूण (Bharat Arun) आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर  (R Sridhar) यांनाही करारबद्ध करण्याचा फ्रँचायझीचा प्रयत्न आहे. या तिघांचाही कार्यकाळ संपला आहे. सीव्हीसी कॅपिटल्सनं अहमदाबाद फ्रँचायझीला 7 हजार कोटींमध्ये खरेदी केलं आहे. लखनऊसह अहमदाबादची टीम पुढील आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022, Ravi shastri

    पुढील बातम्या