Home /News /sport /

IPL 2022 : दोस्त दोस्त ना रहा! विराटने स्टार केलं, पण आता त्याच्यासोबतच खेळायचं नाही!

IPL 2022 : दोस्त दोस्त ना रहा! विराटने स्टार केलं, पण आता त्याच्यासोबतच खेळायचं नाही!

आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Auction 2022) 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये होणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक टीमनी खेळाडू रिटेन केले आहेत. आरसीबीने (RCB) विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांना टीममध्ये कायम ठेवलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 जानेवारी : आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Auction 2022) 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये होणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक टीमनी खेळाडू रिटेन केले आहेत. आरसीबीने (RCB) विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांना टीममध्ये कायम ठेवलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात रेकॉर्ड 32 विकेट घेणाऱ्या हर्षल पटेलला (Harshal Patel) आरसीबीने रिटेन केलं नाही. मागचा संपूर्ण मोसम विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हर्षल पटेलला आता विराटऐवजी दुसराच कर्णधार सर्वोत्तम वाटत आहे. हर्षल पटेलने त्याच्या आवडत्या कर्णधाराबाबत खुलासा केला आहे. एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हर्षल पटेलने एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच आवडत्या कर्णधाराबाबत विचारलं असता हर्षलने विराटचं नाव न घेता एमएस धोनीला पसंती दिली. हर्षल पटेलने आयपीएल 2021 मध्ये आरसीबीकडून खेळताना रेकॉर्ड कामगिरी केली. एका मोसमात सर्वाधिक 32 विकेट घेण्याचा विक्रम हर्षल पटेलने केला. तसंच मोसमात सर्वाधिक विकेट घेतल्याबद्दल हर्षलला पर्पल कॅपही देण्यात आली. या कामगिरीनंतरही हर्षल पटेलला आरसीबीने रिटेन न केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. आता हर्षल पटेल पुन्हा एकदा लिलावामध्ये दिसणार आहे. आयपीएल लिलावासाठी 1214 खेळाडूंनी नावाची नोंदणी केली आहे. यामध्ये 896 भारतीय खेळाडू आहे, तर 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल 2022 च्या लिलावामध्ये दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबादही सहभागी होणार आहेत, म्हणजेच हा लिलाव एकूण 10 टीमसाठी होईल. आयपीएलची प्रत्येक टीम जास्तीत जास्त 25 खेळाडू विकत घेऊ शकते. लिलावाआधी जुन्या 8 टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले, तर लखनऊ आणि अहमदाबादने प्रत्येकी 3-3 असे 6 खेळाडू विकत घेतले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, RCB

    पुढील बातम्या