• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL2022: आरसीबीला मिळाला नवा हेड कोच, Team India शी आहे जवळच नातं

IPL2022: आरसीबीला मिळाला नवा हेड कोच, Team India शी आहे जवळच नातं

Sanjay Bangar

Sanjay Bangar

आयपीएल (IPL2022) च्या आगामी हंगामासाठी माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगर (Sanjay Bangar) यांची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: टीम इंडियाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar New RCB Coach) यांची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने आयपीएल (IPL2022) साठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आरसीबीने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. बांगर यापूर्वी आरसीबीचा फलंदाजी सल्लागारही होता. यंदाच्या आयपीएल (IPL 2021) लिगमध्ये, संघाचे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक, माईक हेसन यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली. यापूर्वी विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. पुढील वर्षापासून तो लीगमधील बंगळुरू संघाची कमान सांभाळणार नाही. मात्र या संघाकडून खेळत राहण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

  मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होताच संजय बांगर म्हणाले..

  आरसीबीचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी या मैदानात उतरलो आहे. एवढ्या मोठ्या फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याची ही एक सन्मानाची आणि अद्भुत संधी आहे. मी यापूर्वी संघातील काही अपवादात्मक आणि प्रतिभावान सदस्यांसोबत काम केले आहे. आणि या संघाला पुढील स्तरावर नेण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही. आयपीएल मेगा लिलाव आणि लीगसाठी आम्हाला खूप काम करावे लागेल. पण मला खात्री आहे की व्यवस्थापन आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या सतत पाठिंब्याने आम्ही चांगले परिणाम देऊ शकू आणि जगभरातील संघाच्या चाहत्यांना आनंद देऊ शकू." असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  आयपीएल 2022 मेगा लिलावाची तयारी सुरू: बांगर

  बांगर म्हणाले की, आयपीएल 2022 च्या मेगा लिलावासाठी आमची तयारी सुरू झाली आहे. मी आरसीबीच्या चाहत्यांना हे आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही एक मजबूत संघ तयार करण्याचा निर्धार केला आहे आणि आम्ही आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. बांगर यांनी टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षकपदाचेही  कार्य सांभाळले आहे. बांगर 2014 ते 2019 पर्यंत टीम इंडियाचे बॅटिंग कोच होते. परंतु विश्वचषक २०१९ नंतर बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ वाढवला नाही आणि त्यांच्या जागी विक्रम राठोर भारतीय संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक बनले.
  Published by:Dhanshri Otari
  First published: