Home /News /sport /

साऊथ मुंबईच्या लक्झरी घरापेक्षाही महाग Rohit Sharma ची Car, IPL नंतर घरी जाताना दिसला फर्स्ट लूक, Video

साऊथ मुंबईच्या लक्झरी घरापेक्षाही महाग Rohit Sharma ची Car, IPL नंतर घरी जाताना दिसला फर्स्ट लूक, Video

IPL 2022 मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सगळ्या खेळाडूंना निरोप दिला. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून रोहित शर्माचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितची नवी लॅम्बॉर्गिनी उरूस (Lamborghini Urus) दिसत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 मधली (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक राहिली. 14 पैकी 10 मॅच हरणारी मुंबई यंदा पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर राहिली. आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा विजय मिळवणाऱ्या मुंबईची ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात खराब कामगिरी आहे. लीग स्टेजलाच मुंबईचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर टीमचे सगळे खेळाडू बायो-बबलबाहेर आले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सगळ्या खेळाडूंना निरोप दिला, यानंतर तो घरी रवाना झाला. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून रोहित शर्माचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितची नवी लॅम्बॉर्गिनी उरूस (Lamborghini Urus) दिसत आहे. याच गाडीमधून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं बायो-बबल सोडून घरी रवाना झाला. रोहित शर्माच्या या नव्या कोऱ्या गाडीची किंमत तब्बल 3.15 कोटी रुपये आहे. आयपीएल सुरू व्हायच्या आधी मार्च महिन्यामध्ये रोहितने ही गाडी विकत घेतली. रोहित शर्माला निळ्या रंगांच्या गाड्यांची क्रेझ आहे. याआधी रोहितकडे निळ्याच रंगाची BMW M5 देखील आहे. लॅम्बॉर्गिनी उरूस ही जगातल्या सगळ्यात जलद एसयूव्हीपैकी एक आहे. तसंच सध्या भारतात उपलब्ध असलेल्या सगळ्यात महागड्या एसयूव्हीपैकी ही एक एसयूव्ही आहे. याशिवाय रोहितने वरळीमध्ये 53 मजली बिल्डिंगमध्ये 29व्या मजल्यावर आलिशान घरही घेतलं आहे. रोहितच्या या घराची किंमत 30 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. आयपीएल बायो-बबलबाहेर आल्यानंतर रोहित शर्मा पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत मालदीवला रवाना झाला आहे. तिथले फोटोही रोहितने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लागोपाठ क्रिकेट खेळत असल्यामुळे रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या एकमेव टेस्टसाठी रोहित टीम इंडियाचा कर्णधार असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma

    पुढील बातम्या