Home /News /sport /

IPL 2022 Final मध्ये पाऊस आला तर कोण होणार चॅम्पियन? पाहा काय आहे नवा नियम

IPL 2022 Final मध्ये पाऊस आला तर कोण होणार चॅम्पियन? पाहा काय आहे नवा नियम

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात 29 मे रोजी आयपीएल 2022 ची फायनल (IPL 2022 Final) होणार आहे. पावसामुळे मॅच होऊ शकली नाही, तर गुजरात-राजस्थान यांच्यात कोणाला विजेता घोषित करण्यात येईल? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद, 29 मे : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात 29 मे रोजी आयपीएल 2022 ची फायनल (IPL 2022 Final) होणार आहे. गुजरातने क्वालिफायर 1 मध्ये राजस्थानला मात देऊन थेट फायनलमध्ये प्रवेश केला, तर राजस्थानने क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटरची विजेती आरसीबीला हरवून फायनलचं तिकीट मिळवलं. गुजरात टायटन्सची ही पहिली आयपीएल आहे, तर राजस्थानने पहिली आयपीएल जिंकली होती. गुजरात आणि राजस्थानचे चाहते या मॅचची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण त्यांना पाऊस उत्साहावर पाणी तर फिरवणार नाही ना, याचीही भीती आहे. आयपीएल 2022 ची फायनल गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. पावसामुळे मॅच होऊ शकली नाही, तर गुजरात-राजस्थान यांच्यात कोणाला विजेता घोषित करण्यात येईल? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. फायनलसाठी राखीव दिवस आयपीएल 2022 ची फायनल रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. खराब वातावरणामुळे मॅच सुरू व्हायला उशीर झाला तर रात्री 10.10 वाजेपर्यंत मॅचला सुरूवात करण्यात येईल. दोन तासांच्या विलंबानंतरही ओव्हर कमी करण्यात येणार नाहीत. हवामानाने खूपच त्रास दिला तर जास्तीत जास्त रात्री 12.26 पर्यंत मॅच सुरू केली जाऊ शकते, या परिस्थितीमध्ये 5-5 ओव्हरचा सामना होईल. आयपीएलच्या नव्या नियमाप्रमाणे पावसामुळे आयपीएल फायनल मध्येच थांबवण्यात आली तर उद्या राखीव दिवशी, मॅच थांबली तिकडूनच सुरू होईल. टॉसनंतर एकही बॉल न टाकता मॅच थांबली तर राखीव दिवशी पुन्हा एकदा टॉस होईल. राखीव दिवशीही पाऊस पडला तर सुपर ओव्हरच्या मदतीने मॅचचा निकाल लागेल. पावसामुळे सुपर ओव्हरही होऊ शकली नाही तर पॉईंट्स टेबलमध्ये पुढे असलेल्या टीमला विजयी घोषित करण्यात येईल. गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर होती. पावसामुळे दोन्ही दिवस सामना होऊ शकला नाही तर गुजरातला विजयी घोषित करण्यात येईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या