अहमदाबाद, 29 मे : आयपीएल 2022 च्या फायनलचा (IPL 2022 Final) महामुकाबला गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात होत आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात राजस्थानने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर गुजरातने अल्झारी जोसेफऐवजी लॉकी फर्ग्युसनला पुन्हा संधी दिली आहे.
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर होत्या. गुजरातने 14 पैकी 10 मॅच जिंकल्या तर राजस्थानला 14 पैकी 9 मॅच जिंकता आल्या. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव करत फायनल गाठली, यानंतर एलिमिनेटरमध्ये लखनऊचा पराभव करणाऱ्या आरसीबीविरुद्ध राजस्थानला क्वालिफायर 2 चा सामना खेळावा लागला, या सामन्यात विजय मिळवून राजस्थान फायनलमध्ये पोहोचली आहे. याआधी लीग स्टेजमध्येही गुजरातने राजस्थानचा पराभव केला होता.
Live Score पाहण्यासाठी क्लिक करा
राजस्थान रॉयल्सने 2008 साली झालेली पहिली आयपीएल जिंकली होती, तर गुजरात टायटन्सचा आयपीएलचा हा पहिलाच मोसम आहे. त्यामुळे आज 14 वर्षांनंतर राजस्थान पुन्हा एकदा चॅम्पियन होईल किंवा गुजरातच्या रुपात आयपीएलला नवा चॅम्पियन मिळेल.
गुजरातची टीम
ऋद्धीमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाळ, मोहम्मद शमी
राजस्थानची टीम
यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मकॉय, युझवेंद्र चहल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals