मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : Lockie Ferguson चा फायनलमध्ये झंझावात, फायनलमध्ये टाकला Fastest Ball

IPL 2022 : Lockie Ferguson चा फायनलमध्ये झंझावात, फायनलमध्ये टाकला Fastest Ball

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये (IPL 2022 Final) राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans vs Rajasthan Royals) होत आहे. गुजरातने अल्झारी जोसेफऐवजी लॉकी फर्ग्युसनला (Lockie Ferguson) संधी दिली.

मुंबई, 29 मे : आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये (IPL 2022 Final) राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans vs Rajasthan Royals) होत आहे, या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. राजस्थानने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केला नाही, तर गुजरातने अल्झारी जोसेफऐवजी लॉकी फर्ग्युसनला (Lockie Ferguson) संधी दिली.

पुनरागमनाच्या सामन्यातच लॉकी फर्ग्युसनने नवीन रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. फर्ग्युसनने मॅचच्या पाचव्या ओव्हरमध्ये टाकलेला सहावा बॉल या मोसमातला सगळ्यात जलद बॉल ठरला आहे. फर्ग्युसनने टाकलेला हा बॉल 157.3 किमी प्रती तासाच्या वेगाचा होता. या बॉलवर बटलरला एकही रन करता आली नाही.

या मॅचआधी आयपीएलच्या या मोसमातल्या सगळ्यात जलद बॉलचं रेकॉर्ड सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) उमरान मलिकच्या (Umran Malik) नावावर होतं. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकने 157 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकला होता. मुंबईत झालेल्या या सामन्यात 20 व्या ओव्हरचा चौथा बॉल मलिकने 157 किमीच्या वेगाने टाकला, या बॉलला रोव्हमन पॉवेलने फोर मारली. याच सामन्यात उमरानने त्याआधी 154.8 किमी प्रती वेगाने बॉल टाकला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात उमरानने 4 ओव्हरमध्ये 52 रन दिले, तसंच त्याला एकही विकेट मिळाली नाही.

उमरान मलिकने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या मॅचमध्ये दोन वेळा 154 किमीच्या वेगाने बॉलिंग केली होती. उमरान मलिकने आयपीएलच्या या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली, या कामगिरीच्या जोरावर त्याची टीम इंडियातही निवड झाली. मलिक या मोसमातला हैदराबादचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. त्याने 14 सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या.

गुजरातच्या लॉकी फर्ग्युसनसाठी मात्र आयपीएलचा हा मोसम निराशाजनक ठरला. फर्ग्युसनने या मोसमात 13 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या. फर्ग्युसनने 9.02 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals