मुंबई, 29 मे : आयपीएल 2022 स्पर्धेच्या फायनलचे काऊंट डाऊन आता सुरू झाले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये आज (रविवारी) गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR) फायनल होणार आहे. या फायनलपूर्वी समारोपाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) देखील फायनलसाठी उपस्थित राहणार असल्याचं वृत्त आहे.
आयपीएल फायनलसाठी उपस्थित राहाणारे केंद्रीय गृहमंत्री तसंच अन्य VIP व्यक्तींच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये 6 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून संपूर्ण स्टेडिअमला त्यामुळे छावणीचं स्वरूप आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयपीएल फायनलसाठी 5000 पोलीस कॉन्स्टेबल आणि 1000 होमार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 17 DCP, 4 DIG, 28 ACP, 51 पोलीस इन्स्पेक्टर आणि 268 सब इन्स्पेक्टर यावेळी सुरक्षेसाठी तैनात असतील.
नरेंद्र मोदी स्टेडिअम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम आहे. आयपीएल फायनल पाहण्यासाठी तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. या सामन्याच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा जय्यत बंदोबस्त करण्यात आला आहे.
VIDEO : कॅच घेण्याच्या नादात कॅप्टनची गेली लाज, Live मॅचमध्ये Oops Moment
यावर्षी साधारण 50 मिनिटे समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ऑस्कर पुरस्कार विजेते भारतीय संगीतकार ए.आर. रहमान, तसंच अभिनेता रणवीर सिंह सहभागी होणार आहेत. कोरिओग्राफर शामक दावरनं या कार्यक्रमाला दिग्दर्शित केलं आहे. संध्याकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमामुळे आयपीएल फायनलची वेळ देखील बदलण्यात आली आहे. आता फायनलचा टॉस संध्याकाळी 7.30 मिनिटांनी होईल. तर मॅच रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals