Home /News /sport /

Dinesh Karthik Story : दिनेश कार्तिकची व्हायरल कहाणी किती खरी? जाणून घ्या सत्य

Dinesh Karthik Story : दिनेश कार्तिकची व्हायरल कहाणी किती खरी? जाणून घ्या सत्य

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीकडून (RCB) खेळताना दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) धमाकेदार कामगिरी केली आहे. सोशल मीडियावर दिनेश कार्तिकची कहाणी (Dinesh Karthik Story) व्हायरल झाली आहे. 'वेळ सगळ्यांची येते, फक्त संयम ठेवण्याची गरज आहे,' असं शिर्षक या कहाणीला देण्यात आलं आहे, तसंच ही कहाणी फेसबूक आणि ट्विटरवर बरीच व्हायरल झाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीकडून (RCB) खेळताना दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) धमाकेदार कामगिरी केली आहे. आरसीबीने कार्तिकला लिलावात 5.5 कोटी रुपयांना विकत घेतलं, याचा टीमला बराच फायदा झाला. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर कार्तिकने आरसीबीला बऱ्याच मॅच जिंकवल्या. कार्तिकच्या या फॉर्ममुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik Story) कहाणी व्हायरल झाली आहे. 'वेळ सगळ्यांची येते, फक्त संयम ठेवण्याची गरज आहे,' असं शिर्षक या कहाणीला देण्यात आलं आहे, तसंच ही कहाणी फेसबूक आणि ट्विटरवर बरीच व्हायरल झाली आहे. दिनेश कार्तिकच्या कमबॅकची कहाणी यात सांगण्यात आली आहे, सोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाबाबतही यामध्ये लिहिण्यात आलं आहे. पत्नीसोबत घटस्फोट, तामीळनाडू टीमच्या कॅप्टन्सीवरून हकालपट्टी, धोनीमुळे टीम इंडिया बाहेर होणं आणि मग आयपीएलमध्ये धमाकेदार पुनरागमन, अशा रंजक गोष्टी या स्टोरीमध्ये सांगण्यात आल्या आहेत, पण या कहाणीची पडतळाणी केली असता यातल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या नसल्याचं समोर येत आहे. दिनेश कार्तिकच्या कहाणीचं सत्य सोशल मीडियावर क्रिकेटसंबंधी माहिती देणाऱ्या अमित सिन्हा यांनी या सगळ्याचं सत्य सांगितलं आहे. कार्तिकच्या स्टोरीचं फॅक्ट चेक करताना अमित सिन्हा यांनी वेगवेगळी तथ्य मांडली आहेत. 2011 साली दिनेश कार्तिकऐवजी मुरली विजय नाही, तर लक्ष्मीपती बालाजीला तामीळनाडूचं कर्णधार करण्यात आलं. कहाणीमध्ये जे सांगितलं आहे त्याच्या हे उलट आहे. दिनेश कार्तिकला मुरली विजयऐवजी आधीच कर्णधार करण्यात आलं होतं. याशिवाय 2012 साली दिनेश कार्तिकला टीम बाहेर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं, पण कार्तिक 2010 पासूनच टीमबाहेर होता, कारण त्यावेळी वर्ल्ड कपसाठी मुख्य खेळाडूंनाच टीममध्ये स्थान मिळत होतं. 2013 साली दिनेश कार्तिकने टीममध्ये कमबॅक केलं, तेव्हा तो 15 मॅच खेळला. रणजी सिझनबाबत जो दावा करण्यात आला, त्याउलट कार्तिकने 2012 साली तामीळनाडूसाठी 64 च्या सरासरीने 577 रन केले. फेसबूकवर शेयर होत असलेल्या पोस्टमध्ये दिनेश कार्तिक डिप्रेशनमध्ये गेल्याचं तसंच व्यसनाधीन झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. तसंच दिनेश कार्तिकला आयपीएलमधूनही बाहेर केल्याचा चुकीचा दावा करण्यात आला आहे. 2012 ते 2015 या मोसमात दिनेश कार्तिकने जवळपास प्रत्येक मॅच खेळली, ज्यात त्याने बऱ्याच रनही केल्या. आयपीएलच्या या मोसमात दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 12 मॅचमध्ये 68.50 च्या सरासरीने 274 रन केले, यात तो 8 वेळा नाबाद राहिला, तसंच त्याने 21 फोर आणि 21 सिक्सही ठोकले. कार्तिकने भारतासाठी 26 टेस्टमध्ये 1025 आणि 94 वनडे सामन्यांमध्ये 1,752 रन तसंच 32 टी-20 सामन्यांमध्ये 399 रन केले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, RCB

    पुढील बातम्या