मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : अर्जुनला संधी नाही, तरी साराने घातली मुंबईची जर्सी, तेंडुलकर फॅमिली 'ब्रेबॉर्न'वर!

IPL 2022 : अर्जुनला संधी नाही, तरी साराने घातली मुंबईची जर्सी, तेंडुलकर फॅमिली 'ब्रेबॉर्न'वर!

Photo- Hotstar/IPL

Photo- Hotstar/IPL

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरच्या (Brebourne Stadium) या सामन्यात मुंबई इंडियन्सना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण तेंडुलकर कुटुंब (Tendulkar Family) मैदानात होतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण तेंडुलकर कुटुंब मैदानात होतं. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा मुंबई इंडियन्सचा मेंटर आहे, तर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आहे. सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) आणि मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) स्टॅण्डमध्ये बसून मुंबईला पाठिंबा देत होत्या. सारा तेंडुलकरने मुंबई इंडियन्सची जर्सीही घातली होती.

ब्रेबॉर्न स्टेडियमवरच्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर मुंबईच्या डग आऊटमध्ये बसले होते, यावेळी सचिन तेंडुलकर अर्जुनसोबत बोलत होता.

अर्जुन आयपीएल 2021 पासून मुंबईचा सदस्य आहे. त्याला अद्याप एकाही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही. 22 वर्षांचा अर्जुन तेंडुलकर डावखुरा फास्ट बॉलर आहे. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये आजवर मुंबईकडून दोन टी20 सामने खेळले असून त्यामध्ये 2 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबईनं अर्जुनला 30 लाखांमध्ये खरेदी केले होते.

लखनऊविरुद्धच्या मॅचआधी मुंबई इंडियन्सचं एक ट्वीट व्हायरल झालं होतं, यानंतर अर्जुन तेंडुलकरला या सामन्यात संधी मिळणार, असं वाटत होतं. ' मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स विरूद्धच्या मॅचसाठी आमच्या डोक्यात एक आयडिया आहे,' अशी पोस्ट मुंबईनं केली होती, त्यामधील हॅशटॅगमध्ये अर्जुन तेंडुलकरचं नाव वापरलं होतं, त्यामुळे अर्जुनला लखनऊला संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली. मुंबई इंडियन्सच्या या पोस्टवर सारानं हार्टची इमोजी वापरत प्रतिक्रिया दिली.

मुंबईने अर्जुन तेंडुलकरचा डोक्यात हेल्मेट घालून नेट प्रॅक्टिस करतानाचा एक फोटोही पोस्ट केला होता, त्यामुळे अर्जुन मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार, अशा चर्चांना आणखी हवा मिळाली, पण अजूनही अर्जुन संधीच्या प्रतिक्षेत आहे.

आयपीएल 2022 च्या या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या पाचही सामन्यांमध्ये टीमचा पराभव झाला. सलग होत असलेल्या पराभवामुळे मुंबई वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देत आहे, त्यामुळे अर्जुनलाही यंदा पदार्पण करायला मिळतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: Arjun Tendulkar, Ipl 2022, Mumbai Indians, Sachin tendulkar