Home /News /sport /

IPL 2022 : भारत सोडून जात होता, एक फोन आला, बॅग भरली आणि...कोण आहे RCB चा गेम चेंजर Rajat Patidar?

IPL 2022 : भारत सोडून जात होता, एक फोन आला, बॅग भरली आणि...कोण आहे RCB चा गेम चेंजर Rajat Patidar?

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये जेव्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डुप्लेसिससारखे (Faf Du Plessis) दिग्गज अपयशी ठरत होते तेव्हा रजत पाटीदार (Rajat Patidar) आरसीबीसाठी (RCB) गेम चेंजर ठरला.

    कोलकाता, 25 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये जेव्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डुप्लेसिससारखे (Faf Du Plessis) दिग्गज अपयशी ठरत होते तेव्हा रजत पाटीदार (Rajat Patidar) आरसीबीसाठी (RCB) गेम चेंजर ठरला. रजत पाटीदारने 49 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. पाटीदार 54 बॉलमध्ये 112 रनवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीमध्ये 12 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. पाटीदारला दिनेश कार्तिकनेही (Dinesh Karthik) चांगली साथ दिली. कार्तिकने 23 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 37 रन केले. पाटीदार आणि कार्तिक यांच्यात 41 बॉलमध्ये नाबाद 91 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे लखनऊला विजयासाठी 208 रनचं आव्हान मिळालं. पाटीदारचे रेकॉर्ड आयपीएल प्ले-ऑफमध्ये शतक करताच पाटीदारच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली. आयपीएलमध्ये शतक करणारा पाटीदार चौथा अनकॅप खेळाडू ठरला, याआधी पॉल वल्थाटी, मनिष पांडे, देवदत्त पडिक्कल यांनी शतकं केली होती. तसंच आयपीएलमधला अनकॅप खेळाडूचा हा तिसरा सर्वाधिक स्कोअर आहे. तसंच आयपीएल प्ले-ऑफमध्ये शतक करणारा पाटीदार सहावा खेळाडू आहे. याआधी सेहवाग, वॉटसन, ऋद्धीमान साहा, मुरली विजय यांनीही प्ले-ऑफमध्ये शतकं केली होती. बिष्णोईच्या ओव्हरला 27 रन 16 व्या ओव्हरमध्ये रवी बिष्णोईच्या बॉलिंगवर आरसीबीने 27 रन ठोकले, यातल्या 26 रन पाटीदारने केल्या. या ओव्हरमध्ये पाटीदारने 3 सिक्स आणि 2 फोर मारले. कोण आहे रजत पाटीदार? रजत पाटीदार आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड ठरला, पण आरसीबीने लिलावात विकत घेतलेल्या लवनिथ सिसोदियाला दुखापत झाली, यानंतर आरसीबीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट माईक हेसन यांनी पाटीदारला फोन केला आणि बॅग पॅक करून आरसीबीच्या टीममध्ये यायला सांगितलं. लिलावात अनसोल्ड राहिल्यामुळे पाटीदार बांगलादेशमध्ये ढाका प्रीमीयर लिगमध्ये किंवा युकेमध्ये क्लब क्रिकेट खेळायला जाणार होता, पण माईक हेसन यांच्या एका फोनमुळे त्याचं आयुष्य बदलं. पाटीदारला आरसीबीने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. रजत पाटीदार मध्य प्रदेशकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. 31 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 7 अर्धशतकांच्या मदतीने 861 रन केले आहेत. आता थेट आयपीएलच्या एलिमिनेटरमध्येच शतक ठोकून पाटीदार आरसीबीसाठी गेम चेंजर ठरला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022

    पुढील बातम्या