Home /News /sport /

IPL 2022 : पंजाबसाठी 'करो या मरो'ची लढत, RCB ने टॉस जिंकला

IPL 2022 : पंजाबसाठी 'करो या मरो'ची लढत, RCB ने टॉस जिंकला

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज आरसीबीचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध (RCB vs Punjab Kings) होत आहे. पंजाब किंग्ससाठी हा सामना करो या मरो आहे, कारण या सामन्यात पराभव झाला, तर पंजाबचं प्ले-ऑफला पोहोचणं अशक्य होईल.

    मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज आरसीबीचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध (RCB vs Punjab Kings) होत आहे. पंजाब किंग्ससाठी हा सामना करो या मरो आहे, कारण या सामन्यात पराभव झाला, तर पंजाबचं प्ले-ऑफला पोहोचणं अशक्य होईल, तर दुसरीकडे आरसीबीचा विजय झाला तर त्यांचं प्ले-ऑफचं तिकीट जवळपास निश्चित होईल. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात आरसीबीने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही, दुसरीकडे पंजाबने संदीप शर्माऐवजी हरप्रीत ब्रारची निवड केली आहे. Live Score पाहण्यासाठी क्लिक करा पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी चौथ्या आणि पंजाब किंग्स आठव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 12 पैकी 7 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर पंजाब किंग्सने 11 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला असून त्यांना 6 सामने गमवावे लागले आहेत. आरसीबीची टीम विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जॉश हेजलवूड पंजाबची टीम जॉनी बेयरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षा, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Punjab kings, RCB

    पुढील बातम्या