मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबईच्या ताफ्यात येणार नवीन फास्ट बॉलर, पण बाहेर कोण जाणार?

IPL 2022 : मुंबईच्या ताफ्यात येणार नवीन फास्ट बॉलर, पण बाहेर कोण जाणार?

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. मुंबईची ही खराब कामगिरी बघता टीममध्ये अनुभवी फास्ट बॉलर येणार असल्याचं वृत्त आहे, पण त्यासाठी मुंबई इंडियन्स कोणाला डच्चू देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 20 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. या मोसमातल्या सुरूवातीच्या सगळ्या 6 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. अजूनही पहिल्या विजयाची प्रतिक्षा असलेल्या मुंबईचा पुढचा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (MI vs CSK) होणार आहे. मुंबईप्रमाणेच गतविजेत्या चेन्नईची कामगिरीही यावेळी खराब झाली आहे. सीएसकेला आतापर्यंत फक्त एकच मॅच जिंकता आली आहे.

चेन्नईविरुद्धच्या मॅचआधी मुंबईच्या टीममधून मोठी अपडेट आली आहे. मुंबई इंडियन्सने बॉलर या मोसमात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे टीममध्ये अनुभवी फास्ट बॉलर धवल कुलकर्णीची (Dhawal Kulkarni) एण्ट्री होणार असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. धवल बरीच वर्ष मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे, तसंच आयपीएलमध्येही त्याच्या नावावर 86 विकेट आहेत.

धवल कुलकर्णीला टीममध्ये आणायचं असेल तर आता मुंबईला सध्याच्या टीममधल्या एका खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवावा लागणार आहे. आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक टीममध्ये जास्तीत जास्त 25 सदस्य असले पाहिजेत. सध्या मुंबईच्या टीममध्ये 24 खेळाडू आहेत. जोफ्रा आर्चरचा बदली खेळाडू मिळणार नसल्याचं बीसीसीआय आणि आयपीएलने आधीच स्पष्ट केलं होतं.

जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याने आयपीएल लिलावात आपल्या नावाची नोंदणी सुरूवातीला केली नव्हती, पण अचानक शेवटच्या क्षणी त्याने लिलावात आपलं नाव नोंदवलं, त्यावेळी बीसीसीआय आणि आयपीएलने आर्चर या मोसमात खेळणार नसल्याचं माहिती असल्याने जर त्याच्यावर बोली लावली तर बदली खेळाडू मिळणार नसल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे मुंबई यावेळी 24 खेळाडू घेऊन खेळत आहे.

आता धवल कुलकर्णीला टीममध्ये घ्यायचं असेल तर रोहित नेमका कोणत्या खेळाडूला डच्चू देतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. टीममध्ये असलेला इंग्लंडचा डावखुरा फास्ट बॉलर टायमल मिल्स दुखापतग्रस्त असल्याचं बोललं जात होतं, पण मिल्सने स्वत:च आपल्याला दुखापत झाली नसून हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन एलन, डेवाल्ड ब्रेविस, बसील थंपी, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, तिलक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, डॅनियल सॅम्स

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians