चहलची नाराजी काहीच दिवसांपूर्वी चहलने आरसीबीने रिटेन केलं नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. मला 100 टक्के आरसीबीकडून खेळायचं होतं, पण आरसीबीचे कोच माईक हेसन यांचा मला फोन आला आणि आम्ही विराट (Virat Kohli), मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि सिराजला (Mohammad Siraj) रिटेन करत आहोत, असं त्यांनी मला सांगितलं. लिलावात आम्ही तुझ्यावर बोली लावू, असं आश्वासन त्यांनी मला दिलं. दोन नव्या टीममध्ये मी जाईन अशी भीती त्यांना होती, पण मी त्यांच्याकडून खेळणार नाही, असं सांगितलं. मी आरसीबीकडे एकही पैसा मागितला नव्हता. चहलने 10-12 कोटी रुपये मागितल्याच्या चर्चा करण्यात आल्या, पण त्यात तथ्य नव्हतं, असं चहल एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता.Dhanashree reaction after #yuzvendrachahal take david willey wickets #RRvsRCB pic.twitter.com/9nCYIY6GKX
— swadesh ghanekar (@swadeshLokmat) April 5, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, RCB, Video viral, Virat kohli