मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

दिल्लीविरुद्ध KKR ने बाबा इंद्रजीत आणि हर्षित राणाला दिली संधी, तर दिल्लीच्या ताफ्यात चेतन साकरियाची एन्ट्री

दिल्लीविरुद्ध KKR ने बाबा इंद्रजीत आणि हर्षित राणाला दिली संधी, तर दिल्लीच्या ताफ्यात चेतन साकरियाची एन्ट्री

dc vs kkr

dc vs kkr

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलचा (IPL) 41वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल करण्यात आलं आहेत.

  • Published by:  Dhanshri Otari
मुंबई, 28 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलचा (IPL) 41वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल करण्यात आलं आहेत. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकला आणि कोलकाताला पहिले फलंदाजीला बोलावले आहे. टॉसपूर्वी हर्षित राणा आणि बाबा इंद्रजीत यांना कोलकाताच्या संघाची कॅप देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू आज आयपीएलमधला पहिला सामना खेळणार आहेत. त्याचवेळी राजस्थानसाठी आश्चर्यकारक कामगिरी करणारा चेतन साकारिया प्रथमच दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे. हर्षित राणा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे, तर इंद्रजित हा उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि लेगस्पिन गोलंदाजीही करतो. चेतन साकारिया हा डावखुरा वेगवान गोलंदाज असला तरी त्याने यापूर्वी राजस्थानकडून खेळताना आपली छाप सोडली आहे. तर दिल्लीच्या संघात चेतन साकरियाची एन्ट्री झाली आहे. दिल्ली सात सामन्यांत तीन विजय आणि सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे, तर कोलकाता तीन विजयांसह आणि आठ सामन्यांत सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे, दिल्लीपेक्षा एक स्थान खाली आहे. दिल्लीची टीम पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, ऋषभ पंत (कर्णधार), मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, रोवमैन पॉवेल, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रहमान, चेतन सकारिया कोलकाता टीम एरोन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, वेंकटेश अय्यर, बाबा इंद्रजीत (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा नो बॉलचा वाद दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) 'नो बॉल' चा वाद विसरून कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध (Kolkata Knight Riders) नव्या जोमानं मैदानात उतरावं लागेल. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा 15 रननं पराभव झाला होताय त्या मॅचमधील शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल न देण्याचा अंपायरचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या निर्णयाला दिल्ली कॅपिटल्लनं विरोध केला. त्यामुळे कॅप्टन ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) मॅच फिसमधील सर्व रक्कम कापून घेण्यात आली आहे. तर सहाय्यक कोच प्रविण आम्रे यांना एका सामन्याची बंदी घालण्यात आलीय.
First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, KKR

पुढील बातम्या