मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

राजस्थानविरुद्ध मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्सची चिंता वाढली, कोच Ricky Ponting मैदानापासून राहणार दूर

राजस्थानविरुद्ध मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्सची चिंता वाढली, कोच Ricky Ponting मैदानापासून राहणार दूर

Ricky Ponting

Ricky Ponting

राजस्थानविरुद्ध लढतीपूर्वी, दिल्ली संघासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सामन्यात खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारे कोज रिकी पाँटिंग(Ricky Ponting)यांच्यावर कोरोनाचे संकट ओढावले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari
मुंबई, 22 एप्रिल: आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 34 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) या दोन संघात पार पडत आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2022) आतापर्यंत दिल्लीने 6 सामने खेळत 3 सामने जिंकून 3 गमावले आहेत. तत्पू्र्वी या लढतीपूर्वी, दिल्ली संघासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सामन्यात खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारे कोज रिकी पाँटिंग(Ricky Ponting)यांच्यावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात सापडली असल्याचे चित्र समोर आले आहे. पथकात एकापाठोपाठ एक पॉझिटिव्ह प्रकरणे समोर येत आहेत. गुजरातच्या खेळाडूंना झालं तरी काय? VIDEO पाहून तुम्हीदेखील गोंधळाल
आता मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या(Ricky Ponting) कुटुंबातील एक सदस्य कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यामुळे, शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या(RR) सामन्यात पाँटिंग डगआउटमध्ये दिसणार नसून ते पाँटिंग पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहतील. मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) रॉयल्सविरुद्ध सामन्यासाठी डगआऊटमध्ये उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पाँटिंग सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. तथापि, पाँटिंगची दोनदा चाचणी निगेटिव्ह आली आहे परंतु ते त्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने त्याला क्वारंटाईन ठेवण्यात आले आहेत. पॉन्टिंग आता पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहतील. काही दिवसांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या दिल्ली टीमच्या सदस्यांसह वैद्यकीय पथक सर्वांवर बारीक नजर ठेवून आहे. संघ सर्व सदस्यांची प्रकृती लवकर बरी होण्याची वाट पाहत आहे. आजवरच्या इतिहासाचा विचार करता राजस्थान आणि दिल्ली संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 - 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज सामना कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष असून यंदाच्या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत.
First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022

पुढील बातम्या