मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : कॅप्टनच ठरला दिल्लीचा व्हिलन, पंतच्या 2 चुकांमुळे रोहित-विराट खूश!

IPL 2022 : कॅप्टनच ठरला दिल्लीचा व्हिलन, पंतच्या 2 चुकांमुळे रोहित-विराट खूश!

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) प्ले-ऑफसाठीच्या चारही टीम आता ठरल्या आहेत. गुजरात, राजस्थान, लखनऊ या तीन टीम आधीच प्ले-ऑफमध्ये दाखल झाल्या होत्या, तर चौथ्या टीमसाठी दिल्ली (Delhi Capitals) आणि आरसीबी (RCB) यांच्यात स्पर्धा होती.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 22 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) प्ले-ऑफसाठीच्या चारही टीम आता ठरल्या आहेत. गुजरात, राजस्थान, लखनऊ या तीन टीम आधीच प्ले-ऑफमध्ये दाखल झाल्या होत्या, तर चौथ्या टीमसाठी दिल्ली (Delhi Capitals) आणि आरसीबी (RCB) यांच्यात स्पर्धा होती. मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला असता तर ते प्ले-ऑफमध्ये पोहोचले असते, पण मुंबईने (Mumbai Indians) विजय मिळाल्यामुळे आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचली.

आरसीबीने या मोसमात 14 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर दिल्लीने 14 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला आणि तेवढ्याच मॅच त्यांनी गमावल्या. मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने केलेल्या चुका टीमला चांगल्याच महागात पडल्या, ज्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नाही.

दिल्लीचा कर्णधार आणि विकेट कीपर असणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) टीम डेव्हिडला (Tim David) पहिल्याच बॉलला जीवनदान दिलं. शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) बॉलिंगवर टीम डेव्हिडच्या बॅटच्या एजला लागून बॉल ऋषभ पंतच्या हातात गेला, यानंतर पंतने अपीलही केलं, पण त्याला दिल्लीच्या इतर खेळाडूंनी साथ दिली नाही, त्यामुळे पंतने डीआरएस (DRS) घेतला नाही. रिप्लेमध्ये डेव्हिडच्या बॅटला बॉल लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. हा रिप्ले बघितल्यानंतर दिल्लीच्या खेळाडूंसह पंतनेही डोक्याला हात लावला.

टीम डेव्हिड बॅटिंगला आला तेव्हा मुंबईला विजयासाठी 33 बॉलमध्ये 65 रनची गरज होती. डेव्हिडने 11 बॉलमध्ये 309.09 च्या स्ट्राईक रेटने 34 रनची वादळी खेळी केली, ज्यात 4 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. ऋषभ पंतने डेव्हिडच्या पहिल्याच बॉलला डीआरएस घेतला असता, तर मॅचचं चित्र कदाचित वेगळं असतं.

ब्रेविसचा कॅच सोडला

टीम डेव्हिडच्या डीआरएस आधीही ऋषभ पंतने विकेट कीपिंगमध्ये मोठी चूक केली होती. 12 व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) बॉलिंगवर पंतने डेवाल्ड ब्रेविसचा (Dewald Brevis) अगदी सोपा कॅच सोडला, त्यावेळी ब्रेविस 22 बॉलमध्ये 25 रनवर खेळत होता. हे जीवनदान मिळाल्यानंतर ब्रेविसने 12 रन केले, ज्यात 1 सिक्सही होती. अखेर शार्दुल ठाकूरने ब्रेविसला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 33 बॉलमध्ये 37 रन करून ब्रेविस पॅव्हेलियनमध्ये परतला.

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने केलेल्या या दोन चुकांमुळे टीमचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आणि आरसीबीला प्ले-ऑफचं तिकीट मिळालं.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians, RCB, Rishabh pant