मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : पूरनची एकाकी झुंज, दिल्लीचा SRH वर दणदणीत विजय

IPL 2022 : पूरनची एकाकी झुंज, दिल्लीचा SRH वर दणदणीत विजय

Delhi Capitals

Delhi Capitals

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादचा (Delhi Capitals vs SRH) 21 रनने पराभव केला आहे. दिल्लीने दिलेल्या 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 186/8 पर्यंत मजल मारता आली.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादचा (Delhi Capitals vs SRH) 21 रनने पराभव केला आहे. दिल्लीने दिलेल्या 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 186/8 पर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून फक्त निकोलस पूरनने (Nichoals Pooran) एकाकी झुंज दिली. पूरनने 34 बॉलमध्ये 62 रन केले, यामध्ये 6 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. याशिवाय एडन मार्करम 25 बॉलमध्ये 42 रन करून आऊट झाला.

दिल्लीकडून खलील अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय शार्दुल ठाकूरला 2 विकेट घेण्यात यश आलं. एनरिच नॉर्किया, मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यांना 1-1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 207/3 एवढा स्कोअर केला. डेव्हिड वॉर्नर (David Warner) 58 बॉलमध्ये 92 रनवर नाबाद राहिला. वॉर्नरने त्याच्या या खेळीमध्ये 3 सिक्स आणि 12 फोर मारल्या. रोव्हमन पॉवेलने (Rovman Powell) 35 बॉलमध्ये नाबाद 67 रनची वादळी खेळी केली. पॉवेलने 6 सिक्स आणि 3 फोर ठोकले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट आणि श्रेयस गोपाळ यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

पॉईंट्स टेबलची चुरस वाढली

दिल्लीच्या या विजयामुळे पॉईंट्स टेबलची चुरस आता वाढली आहे. या विजयासोबत दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. दिल्लीने 10 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे हैदराबाद सहाव्या क्रमांकावर आहे, त्यांनीही 10 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत आणि 5 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे.

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात 16 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे, तर लखनऊचे 14 पॉईंट्स आहेत. यानंतर 2 टीम 12 आणि 3 टीम 10 पॉईंट्सवर आहेत.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, SRH