मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 DC vs SRH : दिल्लीचा 'पृथ्वी'ला धक्का, हैदराबादने टॉस जिंकला

IPL 2022 DC vs SRH : दिल्लीचा 'पृथ्वी'ला धक्का, हैदराबादने टॉस जिंकला

Delhi Capitals

Delhi Capitals

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (Delhi Capitals vs SRH) होत आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (Delhi Capitals vs SRH) होत आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात हैदराबादने टीममध्ये तीन आणि दिल्लीने चार बदल केले आहेत, पण दिल्लीने केलेल्या बदलामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दिल्लीने या सामन्यात पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) बाहेर केलं आहे.

दिल्लीने या सामन्यासाठी शॉ, अक्षर पटेल, मुस्तफिजूर आणि चेतन सकारिया यांना बाहेर केलं आहे, त्यांच्याऐवजी एनरिच नॉर्किया, मनदीप सिंग, रिपल पटेल आणि खलील अहमद यांना संधी दिली आहे. यापैकी अक्षर पटेल दुखापतीमुळे खेळू शकत नसल्याचं दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने सांगितलं.

दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादने कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाळ आणि सीन एबॉट यांना संधी दिली आहे. हे तिन्ही हैदराबादसाठी पदार्पण करत आहेत. वॉशिंग्टन सुंदरला मागच्या सामन्यात दुखापत झाली, तर नटराजनही दुखापतीमुळे खेळू शकत नाहीये आणि मार्को जेनसनला हैदराबादने बाहेर केलं आहे.

Live Score पाहण्यासाठी क्लिक करा

पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद पाचव्या आणि दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 9 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर दिल्लीने 9 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला, तर त्यांचं प्ले-ऑफला पोहोचणं आणखी कठीण होईल.

दिल्लीची टीम

डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत, ललित यादव, रोव्हमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिच नॉर्किया

हैदराबादची टीम

अभिषेक शर्मा, केन विलियमसन, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांग सिंग, श्रेयस गोपाळ, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, उमरान मलिक

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, SRH